Did Riya Chakraborty withdraw Rs 15 crore from Sushant's account? CBI launches probe | रिया चक्रवर्तीने काढले का सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटी? CBI ने केला तपास सुरू

रिया चक्रवर्तीने काढले का सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटी? CBI ने केला तपास सुरू

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता सीबीआयच्या SIT ने तपास करायला सुरूवात केली आहे. सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल करत आरोप केला की तिने सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटी रुपये काढले होते. आता सीबीआय यामागचा गुंता सोडवण्यासाठी तपास सुरू केला आहे. असे सांगितले जात आहे की सीबीआयची SIT सुशांतच्या बँक स्टेटमेंटचा तपास करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सीबीआयकडे सुशांतच्या चार बँकेचे स्टेटमेंट आहेत. त्यांना बँकेच्या माध्यमातून सुशांतच्या अकाउंट्सचे डिटेल्स आधीच मिळाले होते. आता सीबीआय हे समजण्याचा प्रयत्न करत आहे की खरेच सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटी रुपये काढण्यात आले आहेत की असे काहीच घडले नव्हते. सुशांतच्या अकाउंट्सनुसार, त्याच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसेच नव्हते त्यामुळे 15 कोटीच्या गोष्टीत तथ्य नसल्याचे सांगण्यात आले होते. पण सुशांतचे कुटुंब त्यांच्या या दाव्यावर ठाम आहेत.

त्यांनी म्हटले की त्यांच्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे. त्यामुळे आता सीबीआय या गोष्टीचा तपास करत आहेत. ते हे समजण्याचा प्रयत्न करत आहेत की सुशांतच्या अकाउंटच्या माध्यमातून रिया किंवा तिच्या कुटुंबाला 15 कोटी रुपये दिलेत की नाहीत. या प्रकरणी सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करू शकते.

बिहार सरकारच्या सांगण्यानुसार केंद्र सरकारने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले आहे. सीबीआयने एफआयआरमध्ये रिया व तिच्या कुटुंबाचा समावेश केला आहे. सीबीआय शिवाय या प्रकरणाचा ईडीचादेखील तपास वेगाने सुरू आहे. ईडीने रियासोबत दोन वेळा बराच वेळ चौकशी केली आहे. तिचा भाऊ शोविकचीदेखील चौकशी केली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did Riya Chakraborty withdraw Rs 15 crore from Sushant's account? CBI launches probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.