दीया मिर्झाच्या हातावर चेहऱ्यावरच्या जखमा पाहून चाहते पडले चिंतेत,जाणून घ्या प्रेग्नंसीदरम्यान अशी का झाली तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 03:11 PM2021-05-22T15:11:57+5:302021-05-22T15:16:32+5:30

प्रेग्नंसीदरम्यान दीया नित्यनिमयाने योगाभ्यास करते. दीया एका प्रोफेशनल ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली एक्सरसाइज, माइल्ड वेट ट्रेनिंग आणि योगा करतानाचा व्हिडीओ तिने मध्यंतरी शेअर केला होता

Dia Mirza posts a pic of her bruised face with a clarification, worried fans miss message | दीया मिर्झाच्या हातावर चेहऱ्यावरच्या जखमा पाहून चाहते पडले चिंतेत,जाणून घ्या प्रेग्नंसीदरम्यान अशी का झाली तिची अवस्था

दीया मिर्झाच्या हातावर चेहऱ्यावरच्या जखमा पाहून चाहते पडले चिंतेत,जाणून घ्या प्रेग्नंसीदरम्यान अशी का झाली तिची अवस्था

Next

दीया मिर्झा प्रेग्नंट असल्यापासून ती चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. चाहत्यांच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही दिलखुलासपणे देताना दिसते. तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही तितकाच रस असतो. नुकताच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. यात मेडिटेशिन करत असल्याचे पाहायला मिळतंय. दीयाने हा फोटो शेअर केल्यानंतर मेडिटेशन करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी महत्त्व पटवून देणारी पोस्टही लिहीली आहे. 

पण चाहत्यांनी मेडिशनवर लिहीलेल्या पोस्टवर नाहीतर तिच्या अंगावर उमटलेल्या जखमांवरच लक्ष गेले. शेअर केलेल्या फोटो दीयाची झालेली अवस्था पाहून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली. दीयाच्या हातावर आणि चेहऱ्यावरच्या जखमा पाहून चाहतेही तिला अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली असे अनेक प्रश्न चाहते तिच्या या फोटोवर विचारताना दिसतायेत. फोटो शेअर करताच सोशल मीडियावर तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला.

अखेर फोटो पाहून चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचंही उत्तर दीयाने दिले आहे. २०१९ मध्ये ‘काफिर’ वेब सीरिज रिलीज झाली होती. त्याच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. त्यामुळे चिंतेत पडलेल्या चाहत्यांसाठी दीया मिर्झाचा हा फोटो आत्ताचा नसून जुना आहे. तसेच तिच्या या जखमा खऱ्या नसून खोट्या आहेत.


प्रेग्नंसीदरम्यान दीया नित्यनिमयाने योगाभ्यास करते. दीया एका प्रोफेशनल ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली एक्सरसाइज, माइल्ड वेट ट्रेनिंग आणि योगा करतानाचा व्हिडीओ तिने मध्यंतरी शेअर केला होता.दीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे.

दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

Web Title: Dia Mirza posts a pic of her bruised face with a clarification, worried fans miss message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app