दिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:24 PM2021-08-13T16:24:41+5:302021-08-13T16:29:13+5:30

14 मेला दीयाने अव्यानला जन्म दिला होता. मात्र, दीयाने ही गोष्ट 2 महिन्यांपासून मीडियापासून लपवून ठेवली होती.

Dia Mirja shares first look of her son Avyan over social media, check here | दिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो

दिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो

Next


वर्ल्ड एलीफेंट डे निमित्त अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. अनेक महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर असलेल्या दीयाने  मुलगा अव्यानची पहिली झलक दाखवली आहे.दीयाने सोशल मीडियावर अव्यानचा फोटो पोस्ट करून  वर्ल्ड एलीफेंट डेच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.दीया मिर्झा प्रेग्नंसी दरम्यान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होती. बाळाच्या जन्मानंतर चाहतेही बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. 

चाहते आतुरतेने या फोटोची वाट पाहात होते. बाळाच्या जन्मानंतरही दीयाने फोटो शेअर तर केला पण पूर्ण बाळाचा चेहरा दाखवणे तिने टाळले होते यामुळे चाहते थोडे निराश होते..यानंतर तिने मुलगा अव्यानचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अव्यानने पांढऱ्या रंगाचे जंगल प्रिंट असेलले टीशर्ट घातले आहे.

14 मेला दीयाने अव्यानला जन्म दिला होता. मात्र, दीयाने ही गोष्ट 2 महिन्यांपासून मीडियापासून लपवून ठेवली होती. याचे कारण दीयाने सांगितले की, अव्यान प्रीमॅच्युर बेबी आहे. तसेच योग्य वेळ आल्यावरच तिला सर्वांना आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर करायची होती.

 

दीयाने पुढे लिहिले, 'माझ्या गर्भधारणेदरम्यान माझ्यावर अचानक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि नंतर मला त्याचदरम्यान  बॅक्टेरियल इन्फेक्शनही झाले, ज्यामुळे सेप्सिसचा धोका उद्भवू शकत होता. सी-सेक्शनद्वारे आमच्या बाळाचा सुरक्षितपणे जन्म झाला. यासह, दीयाने आपल्या मुलाची काळजी घेतल्याबद्दल डॉक्टर आणि नर्स यांचे आभार मानले आहेत. आता दीया बाळासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.

दिया मिर्झा आणि वैभव रेखा याचवर्षी 15 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या दीड महिन्यानंतर दियाने आपण आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर केली होती. जेव्हा ती हनीमूनसाठी मालदीवमध्ये गेली होती, तेव्हा तिने बेबी बंप फ्लॉन्ट करणारा एक फोटो शेअर केला होता.

 

अनेकांनी लग्ना आधीच प्रेग्नंट राहिलेल्या दीयाला प्रचंड ट्रोलही केले होते. मात्र ट्रोलिंगचा दीयाला अजिबात फरक पडत नाही. ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत अभिनेत्रीने त्यांची कायमचीच बोलती बंद केली होती.

Web Title: Dia Mirja shares first look of her son Avyan over social media, check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app