ठळक मुद्देनुकताच मेघनाने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या सोहळ्याचे काही फोटो मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.

साऊथ सुपरस्टार चिरंजीवी सरजा याचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या उण्यापु-या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाने जगाचा निरोप घेतला. चिरंजीवी या जगातून गेला तेव्हा त्याची पत्नी मेघना राज प्रेग्नंट होती. लवकरच ती चिरंजीवीच्या बाळाला जन्म देणार आहे. चिरंजीवीच्या प्रेमाची निशाणी असलेल्या या बाळाच्या स्वागतासाठी अख्खे सरजा कुटुंबीय आतूर आहे. अशात चिरंजीवीच्या भाऊ व कन्नड अभिनेता धुव्र  सरजा याने या बाळासाठी खास चांदीचा पाळणा बनवला आहे.

या चांदीच्या पाळण्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत धुव्र चांदीच्या पाळण्यासोबत पोज देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या पाळण्याची किंमत 10 लाख रूपये सांगितली जात आहे. दिवंगत भावाच्या बाळासाठी धुव्रने बनवलेला हा चंदेरी पाळणा सध्या कौतुकाचा विषय ठरत आहेत.

चिरंजीवी सरजा आणि मेघना यांनी 2 मे 2018 रोजी लग्न केले होते. हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. 7 जून 2020 रोजी चिरंजीवी सर्जावर काळाने झडप घातली. त्यावेळी मेघना चार महिन्यांची गर्भवती होती. या कठीण काळात धुव्र शिवाय अख्खे सरजा कुटुंबीय खंबीरपणे मेघनाच्या पाठीशी उभे राहिले.

 (दिवंगत अभिनेता चिरंजीवी आणि धुव्र)

चिरंजीवी सरजाने 2009 मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने २२ कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट हिट ठरले होते.  

मृत्यूनंतरही पत्नीच्या डोहाळे जेवणाला उपस्थिती

नुकताच मेघनाने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या सोहळ्याचे काही फोटो मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये मेघनाच्या खूर्चीच्या बाजूला चिरंजीवीचे मोठे कटआऊट लावण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो पाहून चिरंजीवी तेथेच उभा असल्यासारखे भासले होते.  

चिरंजीवीच्या अंत्यदर्शनाचे फोटो पाहून तुमचे डोळे देखील पाणावतील, पत्नीला सावरणे झाले होते कठीण

जहाँ तुम चले गये ! चिरंजीवी सरजाच्या निधनानंतर लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

काही दिवसांपूर्वी मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘चिरु, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण तुझ्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना मला शब्दात व्यक्त करता नाही येत. तुझे माझ्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे तू मला कधीही सोडून जाऊ शकला नाहीस. आपले मूल हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असणार आहे. ते आपल्या प्रेमाची निशाणी आहे. मी आपल्या मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची वाट बघते. तुझा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी फार काळ वाट नाही पाहू शकत’ असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dhruva sarja buys a silver crib for chiranjeevi and meghana raj sarja baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.