बॉलिवूडच्या ‘वीरू’ने गावात बनवला कोट्यवधीचा बंगला, पहिल्यांदा समोर आला आलिशान बंगल्याचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 06:09 PM2019-12-06T18:09:05+5:302019-12-06T18:12:32+5:30

धरमपाजींच्या या पोस्टला त्याच्या चाहत्याने उत्तर दिलं आहे. “धरमपाजी जीवनाचा आनंद घेणं, चांगलं व्यक्ती कसं बनावं हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहे. लव यू धरमपाजी” अशा शब्दांत या चाहत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Dharmendra Built Bunglow worth in crores,First time video of Bunglow Gets Viral | बॉलिवूडच्या ‘वीरू’ने गावात बनवला कोट्यवधीचा बंगला, पहिल्यांदा समोर आला आलिशान बंगल्याचा व्हिडिओ

बॉलिवूडच्या ‘वीरू’ने गावात बनवला कोट्यवधीचा बंगला, पहिल्यांदा समोर आला आलिशान बंगल्याचा व्हिडिओ

googlenewsNext

आपल्या अभिनयाने ८०च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देणारे आणि आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. कुणी त्यांना बॉलीवूडचे हिमॅन म्हणतं तर कुणी वीरू… रसिकांनी धरमपाजींवर कायमच प्रेम केलं आहे. आजही धर्मेंद्र यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावर आपल्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत असतात. आपला बराच वेळ ते इथंच घालवतात. नुकतंच त्यांनी आपल्या बंगल्याची झलक चाहत्यांना दाखवली. सोशल मीडियावर धरमपाजींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा व्हिडिओ पाहून या बंगल्याची किंमत कोट्यवधीच्या घरात असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या बंगल्यात मोठमोठ्या मूर्ती आणि कारंजे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः धरमपाजीसुद्धा दिसत आहेत. मेथीचे पराठे आणि चहाचा ते आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओसोबत धर्मेंद्र यांनी एक पोस्ट लिहिली आहे. “हे सगळं देवानं दिलं असून तोच एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे. हे जीवन खूप सुंदर आहे, मित्रांनो या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. लव यू, चीअर अप” असं धर्मेंद्र यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


धरमपाजींच्या या पोस्टला त्याच्या चाहत्याने उत्तर दिलं आहे. “धरमपाजी जीवनाचा आनंद घेणं, चांगलं व्यक्ती कसं बनावं हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहे. लव यू धरमपाजी” अशा शब्दांत या चाहत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Dharmendra Built Bunglow worth in crores,First time video of Bunglow Gets Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.