मस्करी आली धर्मेंद्र यांच्या अंगाशी, आता मागताहेत हेमा मालिनींची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 02:28 PM2019-07-18T14:28:39+5:302019-07-18T14:29:47+5:30

अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांचा हातात झाडू पकडल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

Dharmendra apologises to fans on social media for trolling wife hema malini | मस्करी आली धर्मेंद्र यांच्या अंगाशी, आता मागताहेत हेमा मालिनींची माफी

मस्करी आली धर्मेंद्र यांच्या अंगाशी, आता मागताहेत हेमा मालिनींची माफी

googlenewsNext
ठळक मुद्देसंसदेच्या परिसरात हेमा मालिनी झाडू काढताना दिसल्या होत्या

अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांचा हातात झाडू पकडल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संसदेच्या परिसरात हेमा मालिनी झाडू काढताना दिसल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. यावर धर्मेंद यांनी ही व्हिडीओ पाहून कमेंट् केली होती की, ''मला हा व्हिडिओ पाहाताना ती वेंधळी वाटत होती.''




आता मात्र सावध पवित्रा घेत धर्मेंद्र यांनी ट्वीट करुन सोशल मीडियावर माफी मागितली आहे. त्याच झाले असे की धर्मेंद्र यांनी केलेल्या ट्वीटनंतर फॅन्सनी हेमा मालिनी यांचे समर्थन केले होते, ज्यानंतर धर्मेंद्र यांनी माफी मागावी लागली. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे. कारचे सहाय्य घेऊन ज्यात हात जोडून बसले आहेत. 



त्याचे झाले असे की धर्मेंद्र यांना एका फॅनने विचारले होते की, ''सर, मॅडमने कधी आयुष्यात झाडू हातात घेतला आहे का? यावर त्यांनी उत्तर दिेले होते की, हो... झाडू हातात घेतला आहे... पण तो चित्रपटात... मला हा व्हिडिओ पाहाताना ती वेंधळी वाटत होती. पण स्वच्छतेबाबत मला विचाराल तर मी कचरा काढण्यात पारंगत आहे. कारण मी माझ्या आईला लहानपणी कामात खूप मदत केली आहे.''




काही दिवसांपूर्वी संसद परिसरात भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह भाजपाच्या दिग्गज मंत्र्यानी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. हेमा मालिनी आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी हातात झाडू घेऊन संसद परिसर स्वच्छ केला होता. पण या स्वच्छता मोहिमेमुळे हेमा मालिनी यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. 

Web Title: Dharmendra apologises to fans on social media for trolling wife hema malini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.