हनी सिंगला कोर्टाने बजावली नोटीस; UAE संपत्तीच्या हस्तांतरणावर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:13 PM2021-09-16T13:13:19+5:302021-09-16T13:15:59+5:30

Domestic violence case: हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचार, मानसिक आणि लैंगिक छळ असे काही आरोप केले आहेत.

delhi court notice to yo yo honey singh in domestic violence case restrained from creating third party rights of uae assets | हनी सिंगला कोर्टाने बजावली नोटीस; UAE संपत्तीच्या हस्तांतरणावर निर्बंध

हनी सिंगला कोर्टाने बजावली नोटीस; UAE संपत्तीच्या हस्तांतरणावर निर्बंध

googlenewsNext
ठळक मुद्देहनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने दाखल केली नवी याचिका

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅप गायक यो यो हनी सिंगच्या Honey Singh अडचणी वाढताना दिसत आहेत.  यो यो हनी सिंग याला दिल्ली कोर्टाने नोटीस बजावली आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने दाखल केलेल्या नव्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. इतकंच नाही तर संयुक्त अरब अमिरातीमधील त्याच्या आणि त्याच्या कंपन्यांच्या मालकीच्या स्थावर तसंच जंगम  movable property मालमत्तेवर तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करण्यापासून त्याला रोखण्यात यावं अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. 
शालिनीने तिचे वकिल संदीप कपूर यांच्या माध्यमातून हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचार, मानसिक आणि लैंगिक छळ असे काही आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने दिल्लीतील तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. हनी सिंग वारंवार मारहाण करत असून त्याच्यामुळे व त्याच्या कुटुंबीयांमुळे मला शारीरिक इजा होईल अशी सतत भीती वाटते. हनी सिंग करत असलेल्या छळामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले असून मला वैद्यकीय मदतीची गरज लागली, असं शालिनीने म्हटलं आहे.

 शर्मिला टागोर यांनी अद्यापही घेतली नाही जेहची भेट; कारण...

दरम्यान, हनीमूनच्या दिवशी हनी सिंगने मारहाण केली होती. तसंच त्याचे अनेक महिलांसोबत शरीरसंबंध आहेत, असे गंभीर आरोपही तिने केले आहेत. शालिनीने हनी सिंगच्या विरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५’ अंतर्गत याचिका दाखल केली आहे. 

Web Title: delhi court notice to yo yo honey singh in domestic violence case restrained from creating third party rights of uae assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.