शर्मिला टागोर यांनी अद्यापही घेतली नाही जेहची भेट; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:30 PM2021-09-16T12:30:10+5:302021-09-16T12:30:25+5:30

Sharmila tagore: अभिनेत्री आणि सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांनी अजूनही त्यांच्या नातवाचं तोंड पाहिलेलं नाही. या गोष्टीचा खुलासा खुद्द करीनाने एका मुलाखतीत केला आहे.

kareena kapoor talks about her mother in law in a interview | शर्मिला टागोर यांनी अद्यापही घेतली नाही जेहची भेट; कारण...

शर्मिला टागोर यांनी अद्यापही घेतली नाही जेहची भेट; कारण...

Next
ठळक मुद्देजेहचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला असून अद्यापही शर्मिला टागोर यांनी जेहला पाहिलेलं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान अललिकडेच दुसऱ्यांदा आई झाली. करीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून जहांगीर असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जहांगीरदेखील तैमुरप्रमाणेच लोकप्रिय होत असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र, अभिनेत्री आणि सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांनी अजूनही त्यांच्या नातवाचं तोंड पाहिलेलं नाही.  या गोष्टीचा खुलासा खुद्द करीनाने एका मुलाखतीत केला आहे.

जेहचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला असून अद्यापही शर्मिला टागोर यांनी जेहला पाहिलेलं नाही. मात्र, याविषयी माझ्या मनात कोणतीही अडी नाही असं करीनाने स्पष्ट केलं आहे. 

"शर्मिला टागोर यांच्याविषयी कधीही कोणी प्रश्न विचारले की माझ्यावर दडपण येतं. त्या एक आदर्श आणि उत्तम व्यक्ती, अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार. त्या माझ्या सासूबाई आहेत याचा मला प्रचंड अभिमान आणि गर्व आहे. त्या एक मस्त व्यक्ती आहेत. त्यांनी या इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. त्या प्रचंड मायाळू, गोड आणि काळजी घेणाऱ्या आहेत. त्या कायम त्यांच्या कुटुंबासाठी हजर असतात. विशेष म्हणजे त्या त्यांच्या सुनेलाही तितकाच वेळ देतात", असं करीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. परंतु, कोरोना काळात हे एक वर्ष ज्या पद्धतीने गेलंय त्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत फार काळ घालवता आला नाही."

दरम्यान, शर्मिला टागोर सध्या मुंबईच्या बाहेर असून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना प्रवास करणं शक्य नाही. त्यामुळेच त्यांनी अद्याप जेहची भेट घेतलेली नाही. परंतु, लवकरच करीना आणि सैफ दिल्लीला त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. या वर्षाच्या शेवटी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.
 

Web Title: kareena kapoor talks about her mother in law in a interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app