ठळक मुद्देदिल्लीमध्ये 'छपाक'च्या टीमने पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे यात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे

सध्या दीपिका पादुकोण तिचा आगामी सिनेमा छपाकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  दीपिका या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून दीपिकाने लक्ष्मी अग्रवालसोबत लंच डेटचा आनंद घेतला आहे. दिल्लीमध्ये 'छपाक'च्या टीमने पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे.

'छपाक'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दीपिका लक्ष्मी सारखीच हुबेहुब दिसत होती. 'छपाक'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. यात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे.


काही दिवसांपूर्वी चित्रीकरणादरम्यानचा दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात ती पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून भररस्त्यात एकटी उभी होती. मात्र तिला कुणीच ओळखू शकले नाही. या व्हिडिओत अभिनेता विक्रांत मेसीसोबत बाइकवरून उतरताना दीपिका दिसली.

विक्रांत हेल्मेट काढून तिथून निघून गेला आणि दीपिका त्याच ठिकाणी उभी असल्याचे पाहायला मिळाले. दीपिका 'छपाक'मधील मालतीच्या लूकमध्ये दिसली. त्यावेळी तिला कुणीच ओळखले नाही. दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. छपाक' सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Deepika padunkone had a lunch with laxmi agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.