Deepika Padukone's father contracted corona, hospitalized | दीपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

दीपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सामन्यांपासून नेता, सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता असे वृत्त समोर येत आहे की दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ६५ वर्षीय माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची तब्येत चांगली आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. असे सांगितले जात आहे की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्याची शक्यता आहे. अद्याप दीपिकाकडून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील काहींनी कोरोनावर मातदेखील केली आहे. या सेलिब्रेटींमध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कतरिना कैफ, आलिया भट, रणबीर कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि सोनू सूद यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone's father contracted corona, hospitalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.