Deepika Padukone's Dressing Style Copy by Ananya Pandey, users said ..... | अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले.....

अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले.....

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडेवर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत चर्चेत असते. फिल्मफेअर अवॉर्डनंतर तिचे कौतुक करणे तर सोडाच तिची खिल्ली उडवत कॉमेडी मिम्स व्हायरल झाले आहे. या अवॉर्डवेळी अनन्याने परिधान केलेला डिजायनर ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहे. आता तिची खिल्ली उडवल्यानंतर तिच्यावर कॉपीकॅटचाही शिक्का बसला आहे. तिने परिधान केलेला ड्रेस हा दिपिका पदुकोणच्या ड्रेसिंग स्टाइलशी खूप मिळता जुळता आहे. त्यामुळे सध्या तिने दीपिका पदुकोणला कॉपी करत सा-यांचे लक्ष वेधले आहे. 

अनन्याने 'स्टुडंट ऑफ द ईयर २ 'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'पति पत्नी और वो'मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनन्या पांडे आता दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

ती दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.अनन्या पांडेच्या साऊथच्या चित्रपटाचे नाव फायटर असून यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवायदेखील आणखीन काही भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता करत आहेत.
 

Web Title: Deepika Padukone's Dressing Style Copy by Ananya Pandey, users said .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.