कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. अभिनेत्री दीपिका पादुकोणने स्वत:ला सेल्फ क्वारांटाईन केले आहे. सोशल मीडियावर तिने क्वारांटाईन दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले होते.

 राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊन संपल्यावर दीपिका पादुकोण सगळ्यात आधी ती आई-वडिलांच्या घरी जाणार आहे. कारण त्याना भेटण्यासाठी दीपिका आधीपासूनच जाणार होती. त्यानंतर ती दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी दोन महिने बाहेर जाणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसुद्धा दिसणार आहे.

  
काही दिवसांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती.  चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे. पण तूर्तास दीपिकाने या प्रोजेक्टसाठी मागितलेला मानधनाचा आकडा पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती अशी चर्चा रंगली होती.निर्माता अश्विनी दत्त हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या बिग बजेट सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी सुरु होणार आहे. दीपिका या चित्रपटात दिसली तर प्रभास व तिची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास ट्रिट असणार आहे.


Web Title: Deepika padukone will meet parents as soon as the lockdown ends gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.