सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. सोशल मीडियापैकी इन्स्टाग्राम हे अनेक सेलिब्रिटींचं आवडतं. इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात.

दीपिका पादुकोणचेही सोशल मीडियावर लाखोंच्या सख्येत फॉलोअर्स आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलिब्रिटीचा पुरस्कारही दीपिकाला मिळाला होता. फॅन्सकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी खूप खूप आभारी  आहे. अशा शब्दांत दीपिकाने पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

या वर्षात मी आणखी बऱ्याच गोष्टी, घडामोडी इन्स्टाग्रामद्वारे मी शेअर करणार असल्याचंही दीपिकाने म्हटले होते.  सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारी दीपिकाने आता मात्र आता एक वेगळाच  निर्णय घेतला आहे. दीपिकाने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिचे दर्शन घडणार नाही. 

सुशांत प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दीपिकाला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. 2017 च्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दीपिकाने 'हॅश' (हशिश) आणि 'माल है क्या?' सारख्या ओळी लिहिल्या होत्या, ती या ग्रुपची स्वतः अॅडमिन असल्याचे उघड झाले होते.

ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यापासून दीपिकाने स्वतःला सध्या सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करत होती. तेव्हाच तिला एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आला होता. त्यामुळे ती शूटींग सोडून मुंबईला परतली होती. आता पुन्हा एकदा दीपिकाने सिनेमाच्या शूटींगला सुरूवात केली आहे. सध्या ती गोव्यातच आहे. शूटींगचा उत्साह सुद्धा तिच्यात चांगलाच पाहायला मिळाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone takes Break From Social Media, know the Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.