Deepika padukone play question answer session on instagram with fans | दिवसाची सुरुवात 'या' कामापासून करते दीपिका पादुकोण, फॅन्सच्या प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

दिवसाची सुरुवात 'या' कामापासून करते दीपिका पादुकोण, फॅन्सच्या प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या चाहत्यांशी संवाद कायम ठेवण्यासाठी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सेलेब्स त्यांच्या चाहत्यांसमवेत बर्‍याच वेळा प्रश्न-उत्तरांचा खेळदेखील खेळतात. ज्यात त्यांचे चाहते सेलिब्रिटींना प्रश्न विचारतात आणि सेलेब्रिटींनीही त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतेच असेच काहीसे केले आहे.

 अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. दीपिकाने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तरांचे सेशन केलं. यावेळी तिच्या चाहत्यांनी दीपिकाला अनेक मजेदार प्रश्न विचारले. ज्याला दीपिकानेही तिच्या मजेदार शैलीत उत्तर दिली. 


या प्रश्न उत्तरा दरम्यान एका चाहत्याने दीपिकाला विचारले की, 'तुझे आवडते खाद्यपदार्थ काय आहे, जे तू बनवतेस?' या प्रश्नाच्या उत्तरात दीपिका म्हणाली, 'कुकीज'. दीपिकाला स्वयंपाक करायला आवडतो. दुसर्‍या चाहत्याने तिला विचारले, 'सकाळी उठल्यावर तुम्ही आधी कोणते काम करता?'

 चाहत्याच्या या प्रश्नावर दीपिकाने एक गमतीशीर उत्तर दिले. दीपिका म्हणाली, "मी आधी अलार्म बंद करते." याशिवाय चाहत्यांनी दीपिकाला अनेक प्रश्न विचारले, ज्यांचे उत्तरही तिनी अतिशय मजेदार पद्धतीत दिली.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर दीपिका शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये दिसणार आहे. नंतर प्रभास बरोबर नाग अश्निवीच्या बहुभाषिक सिनेमात काम करत आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika padukone play question answer session on instagram with fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.