ठळक मुद्देदीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच ती पती रणवीर सिंहसोबत 83 या चित्रपटात झळकणार आहे.

दीपिका पादुकोणचा ‘83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण  त्याआधी दीपिका सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. होय, अगदी अलीकडे एका ड्रेसमुळे दीपिका ट्रोल झाली. आता एअरपोर्टवरील एका व्हिडीओमुळे ट्रोल होण्याची वेळ तिच्यावर आलीय.
व्हायरल भयानीने शेअर केलेल्या या व्हिडीओत दीपिका विमानतळावरून बाहेर पडताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर झाला आणि क्षणात व्हायरल झाला. व्हिडीओ पाहताक्षणी लोकांनी दीपिकावर आगपाखड सुरू केली. काहींना नेहमीप्रमाणे तिचे कपडे खटकले तर काहींना तिचा अ‍ॅटिट्यूड.

 व्हाईट शर्ट, त्यावर डेनिम जॉकेट आणि त्याखाली सायकलिंग शॉट्स अशा अवतारात दीपिका मुंबई विमानतळावर दिसली. दीपिकाने केवळ सायकलिंग शॉट्स घातला असल्याने अनेकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. कदाचित ही जीन्स घालायला विसरली, अशा शब्दांत नेटक-यांनी तिला ट्रोल केले. 

नेटकरी केवळ इथेच थांबले नाहीत तर  आणखी वेगळया कारणावरूनही त्यांनी दीपिकाला फैलावर घेतले. हे कारण काय तर दीपिकाचा अ‍ॅटिट्यूड. होय, दीपिका पुढे चालत असताना तिचा एक टीम मेंबर तिची पर्स पकडून तिच्या मागे चालताना व्हिडीओत दिसतोय. दीपिका गाडीत बसल्यावर टीम मेंबर तिची पर्स तिच्या हाती देतो. हे पाहून नेटक-यांनी दीपिकाला धारेवर धरले. इतके की, तुला तुझी पर्स पकडायला एक व्यक्ती लागते, शेम ऑन यू, असा शब्दांत युजर्सनी तिला सुनावले. तू स्वत:ची पर्स स्वत: उचलू शकत नाहीस का? असा सवाल अनेकांनी तिला केला.


दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच ती पती रणवीर सिंहसोबत 83 या चित्रपटात झळकणार आहे. तसेच द इंटर्न या हॉलिवूड चित्रपटात ती ऋषी कपूरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Deepika Padukone need someone to carry her bag, get troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.