ठळक मुद्देलग्नानंतर दीपिका व रणवीर ‘83’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

दीपवीर अर्थात दीपिका पादुकोणरणवीर सिंगची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या संसारात आनंदी आहेत. पण हे काय? अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिका भलतीच बोलली. होय, मला त्याच्यासोबत कारमध्येही बसायचे नसते, असे दीपिका म्हणाली. दीपिकाच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दोघांत काहीतरी बिनसल्याचे तुम्हाला वाटेल. पण असे काहीही नाही. मग दीपिका असे का बोलली? त्यासाठी तुम्हाला संपूर्ण बातमी वाचावी लागेल.


 नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाला पती रणवीरसोबत काम करताना तुझा व्यवहार कसा असतो? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दीपिकाने हे उत्तर दिले. ‘ रणवीरसोबत काम करताना मी सेटवर त्याची पत्नी नसते. मी कधीच त्याच्यासोबत पत्नीसारखे वागत नाही. अगदी आम्ही एकत्र कारमधून सेटवर वा सेटवरून घरी जाऊ नये हा माझा प्रयत्न असतो.  मला त्याच्यासोबत कारमध्ये बसायचे नसते.  हे फक्त एवढ्यासाठीच की, जेव्हा तुम्ही एकाच सेटवर काम करता त्यावेळी इतर लोकांना तुमच्याकडून पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसारखा व्यवहार अपेक्षित नसतो. त्यामुळे आम्ही दोघे जाणीवपूर्वक एका कारमध्ये जाणे टाळतो, असे दीपिकाने यावेळी सांगितले.


लग्नानंतर दीपिका व रणवीर ‘83’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या सिनेमात ती क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह या सिनेमात क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.


त्याआधी दीपिकाने ‘छपाक’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. ‘छपाक’नंतर  एका डार्क रोमँटिक सिनेमाच्या शूटिंगला ती सुरुवात करणार आहे. शूटिंग पुढील वर्षी या सिनेमाचे सुरू होण्याची शक्यता आहे.   हा डार्क सिनेमा असला तरीही त्याची पार्श्वभूमि मात्र रोमँटिक आहे.


 


Web Title: deepika padukone made statement over working together with ranveer singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.