दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील हॉट कपल पैकी एक आहे. दोघांनी सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. दीपिकाने नुकतेच  हार्पर्स बाजार यूएस या मॅगझीनला दिलेल्या मुलाखती दरम्यान लग्नाशी संबंधीत तिने अनेक खुलासे केले आहेत. दीपिकाला यावेळी लिव्ह इनमध्ये राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर दीपिका म्हणाली, जर आम्ही लिव्ह-इनमध्ये राहिलो असतो तर लग्नानंतर आमच्या काही नवीन गोष्टी करण्याची संधी राहिली नसती. आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. सध्या आम्ही वैवहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेत आहोत. 


रणवीर आणि दीपिकाने पहिल्यांदा संजय लीला भन्साळींच्या 'गोलिंयो की रासलीला रामलीला' सिनेमा एकत्र काम केले. यात सिनेमात दोघांची मुख्य भूमिका होती. याच सिनेमाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले.  रणवीरने सांगितले, ''या सिनेमातील एक गाण्यावर नाचताना पाहिले आणि त्याचक्षणी तो तिच्याप्रेमात पडला.''  यासिनेमानंतर या कपलच्या लव्हलाईफ चर्चेत आली. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. 


वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग 83 सिनेमात एकत्र दिसणार आहे. यार दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे.

 लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा १० एप्रिल २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Deepika padukone on live in with ranveer singh before marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.