deepika padukone invites photographer to sit with her video goes viral | Video Viral : फोटोग्राफर सोडेना पिच्छा; दीपिका पादुकोण म्हणाली, आजा बैठ जा...!!

Video Viral : फोटोग्राफर सोडेना पिच्छा; दीपिका पादुकोण म्हणाली, आजा बैठ जा...!!

ठळक मुद्देदीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती ‘छपाक’ आणि ‘83’ या दोन चित्रपटात बिझी आहे.

दीपिका अलीकडे मुंबई एअरपोर्टवर दिसली. याचदरम्यानचा दीपिकाचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दीपिका एअरपोर्टमधून बाहेर येताच,मीडियाचे कॅमेरे तिच्यावर रोखले जातात. पापाराझी तिच्यामागे धावतात. अगदी एअरपोर्ट गेटपासून तर तिच्या गाडीपर्यंत ते तिचा पाठलाग करतात. दीपिकाला हे पाहून हसू आवरत नाही. पापाराझी कारपर्यंत पोहोचलेले पाहून दीपिका कारचा दरवाजा उघडते आणि हसत हसत एका कॅमेरामॅनला, आजा बैठ जा, असे म्हणते. तिचे हे शब्द ऐकून सगळेच हसायला लागतात.


  या व्हिडीओत दीपिका सिल्व्हर कलरचा ट्राऊजर आणि व्हाईट टॉपमध्ये दिसतेय.  दीपिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या १५ तासात  २ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.


याआधी दीपिकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात एअरपोर्टवरचे सुरक्षा रक्षक तिच्याकडे आयडी कार्डची मागणी करताना दिसले होते. सुरक्षा रक्षकांनी आयडी कार्ड मागितल्यावर दीपिका अगदी शांतपणे मागे वळते आणि त्यांना आयडी कार्ड दाखवते, असा हा व्हिडीओ होता.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती ‘छपाक’ आणि ‘83’ या दोन चित्रपटात बिझी आहे. ‘छपाक’ हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. दीपिका यात लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ‘83’ या सिनेमात ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटात दीपिकाचा पती रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: deepika padukone invites photographer to sit with her video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.