Deepika padukone has blamed karishma and talent manager jaya saha for revealing the drug chats | ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने 'या' दोन व्यक्तींना ठरवले दोषी

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने 'या' दोन व्यक्तींना ठरवले दोषी

एनसीबीने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवला आहे. एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला सुद्धा समन्स पाठवला आहे. करिश्माने प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शुक्रवार म्हणजेच 25 सप्टेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोणने तिचे ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर करिश्मा प्रकाश आणि टॅलेंट मॅनेजर जया साहाला यासाठी जबाबदार ठरवले आहे. या रिपोर्टनुसार दीपिका मुंबईत 12 लोकांच्या लीगल टीमशी  व्हिडीओ कॉलने संपर्कात आहेत. दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग या टीमचा भाग आहे.

दीपिका आज मुंबईत येण्याची शक्यता
एनसीबीने दीपिकाला 25 सप्टेंबरपर्यंत  हजर राहण्याचे आदेश दिले आहे. दीपिका आज(गुरुवारी) मुंबईत परत येऊ शकते अशी आशा आहे, गेल्या आठवड्यात दीपिका आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी क्रू सोबत गोव्याला  गेली आहे. या सिनेमात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. 

करण जोहरच्या पार्टीतला व्हिडीओ लॅबमध्ये 
याच दरम्यान असे कळतेय की 2019मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या कथित ड्रग्स पार्टीचा व्हि़डीओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. एफएसएल आता व्हिडिओची पडताळणी करेल. या पार्टीत दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन आणि रणबीर कपूरसह अनेक कलाकार दिसले होते. हा व्हिडिओ पाहून असं म्हटलं जात होतं की बॉलिवूड सेलेब्स  ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत आहेत. करण जोहरने लोकांचे हे आरोप फेटाळून लावत, असे म्हणणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करु असे म्हटले होते. 

जया सहा आणि अनुजकच्या चौकशीतून दीपिकाचे नावसमोर
जया सहा व ड्रग तस्कर अनुजकडील चौकशीतून प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनचे नाव पुढे आले. त्याचबरोबर तिच्याकडे मॅनेजर म्हणून काम केलेल्या करिश्मा प्रकाश हिच्याशी तिचा ड्रग चॅट एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे. 28 ऑक्टोबर 2017 मध्ये एका पार्टीमध्ये तिने 'माल'ची विचारणा केली आणि तिला गांजाची पूर्तता केली जाईल, सांगण्यात आले आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून विचारणा केली जाणार आहे.

म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल

 

टॉप बॉलिवूड अभिनेत्रींना NCB कडून समन, कंगना म्हणाली - त्यांना पश्चाताप होत असेल....
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika padukone has blamed karishma and talent manager jaya saha for revealing the drug chats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.