बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी कुणापासून लपलेली नाही. एक वेळ असा होता जेव्हा रणबीर आणि दीपिकाच्या अफेअरच्या चर्चा इतकी व्हायची की लोक म्हणायचे की दीपिका लवकरच कपूर कुटुंबाची सून बनेल. मात्र हे नाते पुढे जाण्याआधीच तुटले. दोघांच्या लव्हस्टोरी पासून त्यांच्या ब्रेकअपबद्दल सर्वांनाच माहित आहे. दीपिका ब्रेकअपनंतर पूर्णपणे कोलमडून गेली होती. ती डिप्रेशनला बळी पडली होती. हे डिप्रेशन दूर करण्यासाठी रणबीर कपूर वेदना देऊन औषध बनला होता.


दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांची प्रेमकथा सुरू झाली तेव्हा पासूनच अभिनेत्री या नात्याला घेऊन खूप सीरिअस झाली होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र वेदना देणारा व्यक्ती औषध बनून समोर आला. दीपिकाच्या जीवनातील वाईट काळात रणबीर तिच्या मदतीसाठी पुढे आला आणि मित्र म्हणून डिप्रेशनमधून तिला बाहेर काढण्यासाठी संपूर्ण मदत केली होती. खुद्द ही गोष्ट दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत स्वीकारली होती. 


हेच कारण आहे ज्यामुळे रणबीर आणि दीपिकामध्ये ब्रेकअप झाले असले तर ते दोघे आजही चांगले मित्र आहेत. इतकेच नाही तर दीपिका आणि रणबीर आजही एकमेकांना भेटत असतात.


वृत्तांनुसार, रणबीर आणि दीपिका यांचे अफेयर जास्त काळ टिकू शकले नाही. कारण त्या दोघांच्या नात्यात कतरिना कैफ आली होती. दीपिकाने रणबीर आणि कतरिनाला तिला चीट करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दीपिका आणि रणबीर वेगळे झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone had gone into depression after the breakup, Ranbir Kapoor had become both pain and medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.