deepika padukone forgets husband ranveer singh during an series launch event in delhi | Video: दीपिका पादुकोण रणवीर सिंगची पत्नी असल्याचे विसरते तेव्हा...
Video: दीपिका पादुकोण रणवीर सिंगची पत्नी असल्याचे विसरते तेव्हा...

ठळक मुद्देडिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर दीपिकाने 2015 मध्ये ‘लिव्ह, लाफ, लव्ह’ या फाऊंडेशनची स्थापना केली होती.

गत रविवारी दीपिका पादुकोणने लिव्ह, लाफ, लव्ह या आपल्या फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिजच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. पण या इव्हेंटमध्ये दीपिका एक गोष्ट विसरली. मग काय, तिची ही ‘चूक’ लगेच व्हायरल झाली.
 डिप्रेशनशी लढणा-या लोकांसाठी दीपिकाने 2015 मध्ये ‘लिव्ह, लाफ, लव्ह’ या फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनने आयोजित केलेल्या लेक्चर सीरिजच्या लॉन्च इव्हेंटला दीपिकाने  आई-वडिल व बहिणीसोबत हजेरी लावली.

डिप्रेशन या विषयावर बोलताना दीपिकाने खºया आयुष्यात ती वठवत असलेल्या अनेक भूमिकांचा उल्लेख केला. ‘मी एक मुलगी आहे, बहीण आहे, अभिनेत्री आहे....,’ असे ती म्हणाली. ती पुढे बोलणार याचआधी ‘तू पत्नीही आहेस’ याचे कोणीतरी तिला  स्मरण करून दिले. तेव्हा कुठे दीपिकाला आपली चूक उमगली. आणि हो... मी एक पत्नी सुद्धा आहे, अरे देवा मी विसरलेच..., असे हसत हसत म्हणत दीपिकाने आपली ही चूक सुधारली. यावर सगळीकडे खसखस पिकली, हे सांगायला नकोच.
 या इव्हेंटचा दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


 या इव्हेंटला दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनिशा हे सुद्धा उपस्थित होते. रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका स्वत: डिप्रेशनमध्ये गेली होती. अनेक प्रसंगी तिने याचा उल्लेख केला आहे. डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर दीपिकाने 2015 मध्ये ‘लिव्ह, लाफ, लव्ह’ या फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्याला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत.


Web Title: deepika padukone forgets husband ranveer singh during an series launch event in delhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.