ठळक मुद्देकबीर खानची पत्नी मिनी माथुरने सोशल मीडियावर दीपिका आणि तिच्या मुलीचे मजा-मस्ती करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, ८३ च्या सेटवर सगळ्यात जास्त सायरा एन्जॉय करत असून दीपिकासोबत ती खूपच खूश आहे. 

रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील रणवीरचा लूक काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. हा त्याचा लूक त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्याविषयी तिने सांगितले होते की, '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय दुसरा कुणी अभिनेता साकारत असता तरी देखील मी या चित्रपटात काम केले असते. 

लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय. या चित्रपटाच्या टीममध्ये अनेक कलाकार असल्याने या चित्रपटाची टीम चित्रीकरणासोबत प्रचंड धमाल मस्ती करत आहे. 

८३ या चित्रपटाच्या सेटवर दीपिकाला आता एक छोटीशी मैत्रीण भेटली आहे. या मैत्रिणीसोबत ती अधिकाधिक वेळ घालवत आहे. ही मैत्रीण दुसरी कोणीही नसून या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खानची मुलगी आहे. कबीर खानची पत्नी मिनी माथुरने सोशल मीडियावर दीपिका आणि तिच्या मुलीचे मजा-मस्ती करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, ८३ च्या सेटवर सगळ्यात जास्त सायरा एन्जॉय करत असून दीपिकासोबत ती खूपच खूश आहे. 

१९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
 

Web Title: Deepika Padukone finds new friend on 83 set, Kabir Khan's daughter Sairah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.