ठळक मुद्देदीपिकानेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. Louis Vuitton या आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करण्यास ती खूप उत्सुक असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे म्हटले आहे.

दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिच्या बाजीराव मस्तानी, पद्मावत, गलियों की रासलीला-रामलीला, ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. तिच्या छपाक या चित्रपटाला देखील समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करत असून तिला नुकतेच वर्ल्ड इकोनॅमिक फोरमच्या क्रिस्टल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तर दीपिकाने बॉलिवूडमधील सगळ्या अभिनेत्रींना मागे टाकत एक इतिहास रचला आहे.

एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची जाहिरात करण्याचा मान अद्याप कोणत्याच बॉलिवूडमधील अभिनेत्रीला मिळालेला नव्हता. पण आता या ब्रँडची जाहिरात दीपिका पादुकोण करणार आहे. दीपिकानेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. Louis Vuitton या आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करण्यास ती खूप उत्सुक असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर तिची निवड केल्याबद्दल तिने त्यांचे आभार देखील मानले आहेत. 

दीपिका या फॅशन ब्रँडच्या निमित्ताने सोफी टर्नर, एम्मा रॉबटर्स, ली सेयडॉक्स, क्लो ग्रेस मोरेटज, एलिसिया विकेंडर यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम करणार आहे. तिने नुकतेच या ब्रँडसाठी फोटोशूट केले असून तिने यात चेक्सचा ड्रेस आणि त्यावर विंटर जॅकेट घातला आहे. तसेच तिने गम बूट घातले आहेत. 

दीपिकाने ही पोस्ट शेअर करून केवळ तीन तास झाले असले तरी पाच लाखावरून अधिक लोकांनी ही पोस्ट लाइक केली आहे. तसेच अनेकांनी या फोटोद्वारे दीपिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Deepika Padukone is face of Louis Vuitton’s latest collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.