बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे इन्स्टाग्रामवर सुमारे 4 कोटी 13लाख फॉलोअर्स झालेत. तिने आतापर्यंत सुमारे 1 हजारहून अधिक पोस्ट शेअर केल्या असून ७० हून अधिक जणांना ती फॉलो करते. या अकाऊंटवरून तिने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंना बरीच पसंती मिळाली होती. 


प्रियांका चोप्रा - बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर 4 कोटी 71 लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे 3 हजार ७०० हून अधिक पोस्ट शेअर केल्या असून ३८४ अधिक जणांना ती फॉलो करते. प्रियंकाने निक जोनाससह लग्न करत आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.  या अकाऊंटवरून तिने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंना तुफान पसंती मिळाली होती. 

आलिया भट- राजी, उडता पंजाब अशा विविध सिनेमांमधील भूमिकांनी रसिकांची मने जिंकलेल्या अभिनेत्री आलिया भटचे सोशल मीडियावर 4 कोटी 5 लाख फॉलोअर्स आहेत. १ हजार 532 पोस्ट तिने शेअर केल्या असून 520 जणांना ती फॉलो करते.


अनुष्का शर्मा - अभिनेत्री अनुष्का शर्माही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तिचे 3 कोटी 9 लाख फॉलोअर्स असून ती 206 जणांना फॉलो करते. अनुष्काने 875 पोस्ट शेअर केल्या आहेत. विराटसह अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. इन्स्टावर सर्वाधिक अनुष्काचे लग्न चर्चेत राहिले होते. लग्नसोहळा ते हनीमुनपर्यंतचे सर्व फोटोंना सर्वाधिक पसंती मिळाली होती. 


 सोनम कपूर - बॉलीवुडची मस्सकली अभिनेत्री सोशल मीडियावरून फॅन्सशी संवाद साधते. सोनमचे सोशल मीडियावर 2 कोटी 37 लाख फॉलोअर्स आहेत. ३ हजार ५९८ पोस्ट तिने शेअर केल्या आहेत. नेटवर्किंग साईट्सवर सोनमच्या लग्नाचीही चांगलीच चर्चा झाली.


नेहा धुपिया- नेहा सोशल मीडियावरून फॅन्सशी संवाद साधते. नेहाचे  3 कोटी 6 लाख इतके फॉलोअर्स आहेत. तिने आतापर्यंत 3 हजार 107 पोस्ट शेअर केले आहेत.ती 449 लोकांना ती फॉलो करते. अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न करत तिने आयुष्याची नवीन सुरूवात केली. विशेष म्हणजे लग्नांच्या फोटोंसोबतच ती लग्नाआधी प्रेग्नंट होती. यामुळे सोशल मीडियावर तिची सर्वाधिक चर्चा झाली. आधी नेहाने तीन लोकांना डेट केले होते. होय, रित्विक भट्टाचार्य, युवराज सिंग आणि जेम्स सिल्वेस्टरसोबत नेहा रिलेशनशिपमध्ये होती.

सनी लिओनी - पॉर्न स्टार आणि बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनीचे कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावरही सनीचे 2 कोटी 91 लाख फॉलोअर्स आहेत. 3 हजार 222 पोस्ट तिने शेअर केल्या आहेत. 68 लोकांना ती फॉलो करते.

दिशा पटानी- महेंद्रसिंह धोनी - 'द अनटोल्ड स्टोरी' सिनेमातून मनं जिंकलेल्या दिशाचे सोशल मीडियावर १ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आत्तापर्यंत 1 हजार 947 इतके पोस्ट शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहमीच दिशाचा  ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना घायाळ करत असते.

 

Web Title: From Deepika Padukone to Disha Patani, 2019 was remarkable for these actresses in followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.