ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण काल शनिवारी एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाली. सुमारे पाच तास तिची चौकशी झाली. यावेळी दीपिकाला एनसीबीच्या अनेक कठोर व कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला. या प्रश्नांचा भडीमार सहन करत असताना दीपिकाला एकदा नाही तर तिनदा रडू कोसळले.

इंडिया टुडेने एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका शनिवारी सकाळी 10 वाजता एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. यानंतर लगेच तिच्या चौकशीला सुरुवात झाली. यादरम्यान, ड्रग्जसंदर्भात आपण चॅट केले होते, असे तिने कबुल केले. मात्र  स्वत: ड्रग्ज घेत असल्याचा इन्कार केला. चौकशीत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले जात असताना दीपिकाला अचानक रडू कोसळले. असे एकदा नाही तर तीनदा झाले. तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत.

एनसीबीच्या अधिका-यांनी बजावले
दीपिकाला वारंवार रडताना पाहून एनसीबीची टीमने तिला स्पष्टपणे बजावले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोशनल कार्ड खेळू नकोस, असे अधिका-यांनी तिला स्पष्ट बजावले. रडण्याऐवजी तू सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरे देशील तर योग्य होईल. सरतेशेवटी एनसीबीच्या अधिका-यांनी अगदी हात जोडून दीपिकाला समजावले. सत्य सांगितले तर तुझ्या अडचणी कमी होऊ शकतील. तेव्हा रडण्यापेक्षा खरे बोल, असे अधिका-यांनी तिला म्हटले.

ड्रग्ज चॅट केल्याची दिली कबुली

दीपिकाने मॅनेजर करिश्मासोबत ड्रग्ज चॅट केल्याची कबुली एनसीबीसमोर दिल्याचे कळते. 28 ऑक्टोबर 2017 रोजी केलेल्या चॅटमध्ये दीपिका व करिश्मा ड्रग्जबद्दल बोलल्या होत्या.  मात्र ड्रग्ज घेत असल्याचा तिने इन्कार केला. तिला व करिश्माला समोरासमोर बसवून ड्रग्ज चॅटबद्दल विचारले तेव्हा, दोघींनीही ड्रग्ज घेतल असल्याचे नाकारले. आम्ही ड्रग्ज घेत नाही. डूप घेतो. जी एक वेगळ्या प्रकारची सिगारेट असते. ज्यात अनेक गोष्टी भरलेल्या असतात. दीपिकाने हे मान्य केले की, ती डूप (सिगारेट) घेते. मात्र यात ड्रग्ज असते का, यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. एनसीबीच्या चौकशीत दीपिकाने अनेक उडवाउडवीची उत्तरे दिल्याचेही कळते. तिच्या या उत्तरांवर एनसीबी अधिकारी समाधानी नसल्याचेही कळते.

चाहते दीपिकाच्या बाजूने
दीपिकाची एनसीबीकडून चौकशी सुरु असताना इकडे सोशल मीडियावर ‘स्टँड विद दीपिका’ हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. हा हॅशटॅग वापरून दीपिकाचे चाहते तिला सपोर्ट करताना दिसले. दीपिकाने जेएनयू विद्यार्थ्यांचा सपोर्ट केला होता म्हणून तिला ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा तिच्या काही चाहत्यांनी केला. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेनंतर दीपिका प्रोटेस्ट करत याठिकाणी विद्यार्थ्यांना भेटायला गेली होती. या प्रकरणावरून मोठे वादळ उठले होते.

दीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड

NCB ऑफिसपर्यंत मीडियाने पाठलाग करू नये म्हणून दीपिकाने वापरली होती 'ही' ट्रिक!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: deepika padukone cries thrice in ncb interrogation on drugs case sushant singh-rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.