दीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड

By अमित इंगोले | Published: September 26, 2020 11:45 AM2020-09-26T11:45:22+5:302020-09-26T11:50:40+5:30

सोशल मीडियावर एक मोठा वर्ग दीपिकाच्या सपोर्टमध्ये समोर आला आहे. ट्विटरवर लोक #StandWithDeepika हा हॅशटॅग वापरून दीपिकाला सपोर्ट करत आहेत.

ड्रग चॅट केसमध्ये दीपिका पादुकोणचं नाव समोर आल्यावर शनिवारी दीपिका चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. पण त्याआधीच सोशल मीडियावर एक मोठा वर्ग दीपिकाच्या सपोर्टमध्ये समोर आला आहे. ट्विटरवर लोक #StandWithDeepika हा हॅशटॅग वापरून दीपिकाला सपोर्ट करत आहेत.

अनेक लोकांना असं वाटत आहे की, दीपिका जेएनयूच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी गेली होती म्हणून तिला या ड्रग केसमध्ये ओढलं जात आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेनंतर दीपिका पादुकोण प्रोटेस्ट करत असलेल्या स्टुडंट्सच्या सपोर्टमध्ये तिथे गेली होती.

ड्रग चॅट केसमध्ये जया साहाच्या चौकशी दरम्यान काही व्हाट्सअॅप चॅट्स समोर आले होते. यातील काही चॅट हे कथितपणे दीपिका पादुकोणचे असल्याचे सांगण्यात येत आहेत. जया साहाच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीही चौकशी केली. आता दीपिकाची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, दीपिकाची चौकशी होत असताना मला तिच्यासोबत राहू देण्याची रणवीर सिंहने एनसीबीकडे विनंती केल्याची चर्चा सुरू होती. पण नंतर एनसीबीने रणवीर सिंहकडून अशाप्रकारची कोणतीही विनंती आली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे दीपिकाला एकटीलाच एनसीबीच्या प्रश्नांचा सामना करायचा आहे.