ठळक मुद्देहा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

  महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांमुळे देश खदखदत असताना आज मुंबईत अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘छपाक’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला. अभिनेत्री दीपिका पादुकोण या सिनेमात लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे. आज ‘छपाक’च्या ट्रेलर लॉन्चला दीपिका हजर होती. पण हे काय? ट्रेलर लॉन्च दरम्यान असे काही झाली की, दीपिका ढसाढसा रडू लागली.
‘छपाक’ची दिग्दर्शिका मेघना गुलजार हिने दीपिकाला स्टेजवर येण्याची विनंती करताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेला. दीपिका स्टेजवर आली आणि तिला भावना अनावर झाल्यात. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ट्रेलर लॉन्च होणार, हे माहित होते. पण त्यानंतर मला बोलावे लागेल, याचा मी विचारच केला नव्हता, असे ती म्हणाली आणि पुन्हा ढसाढसा रडू लागली.

यानंतर दीपिकाने कसेबसे स्वत:ला सावरले. ‘मी जेव्हा जेव्हा हा ट्रेलर पाहते तेव्हा तेव्हा मला अश्रू अनावर होतात. आपल्या देशात आपण पीडितांना चांगली वागणूक देत नाही, त्यांना गुन्हेगारासारखे वागवले जाते, असेही ती म्हणाली. 


दीपिकाशिवाय या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 
या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासन् तास मेकअप करावा लागत असे.

 ‘छपाक’चे शूटिंग संपल्यावर शेवटच्या दिवशी दीपिकाने हे प्रोस्थेटिक्स लुक जाळून टाकले होते. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता. ‘मी या प्रोस्थेटिक्सचा एक तुकडा घेतला. अल्कोहोल घेतले आणि एका कोप-यात नेऊन तो प्रोस्थेटिक्स जाळून टाकला’, असे तिने सांगितले होते.

Web Title: Deepika Padukone breaks down at Chhapaak trailer launch, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.