ठळक मुद्देएका युजरने हा सर्व रणवीर सिंगचा प्रभाव असल्याचे म्हटले. तर एकाने ‘बोरिंग’ असे लिहित दीपिकाला ट्रोल केले.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या यशाच्या शिखरावर आहे. दमदार चित्रपटांसोबत तिच्या करिअरचा ग्राफ वेगाने वर जातोय. पण सोशल मीडियाचे म्हणाल तर या व्यासपीठावर सर्व लहान-मोठे स्टार्स समान आहे. स्टार छोटा असो वा मोठा, इथे प्रत्येकजण ट्रोल होतो. सोशल मीडिया युजर्स न घाबरता स्टार्सची खिल्ली उडवताना दिसतात. आता दीपिकाचेच बघा. म्हणायला इतकी मोठी स्टार पण सध्या ती प्रचंड ट्रोल होतेय. कारण काय तर तिचे ताजे फोटो.

होय, दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले आणि या फोटोतील तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. या फोटोद्वारे दीपिका Balmain या नावाचा एक फ्रेंच ब्रँड प्रमोट करतेय. बलमा...बलमा... फॅशन का है ये बलमा... असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.

या फोटोत दीपिकाने ब्लॅक पँटसूट व ब्जेजर घातलेला दिसतोय.  सोबत ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि डोक्यावर पदर असा तिचा अवतार आहे. काही लोकांना तिचा हा अवतार आवडला. पण अनेकांना मात्र तो जराही आवडला नाही. मग काय,युजर्सनी दीपिकाचा चांगलाच क्लास घेतला. 


‘बिल्कुल भी बात नहीं बन रही’, असे एका युजरने तिच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने तिच्या या फॅशन सेन्सला ‘डिजास्टर’ असे नाव दिले. ‘तुझी ही डिजास्टर फॅशनची निवड पाहून मी केवळ इतकेच म्हणू शकतो की, फॅशन आणि काहीही उचलले अन् घातले यात फरक असतो,’ असे या युजरने लिहिले.

एका युजरने हा सर्व रणवीर सिंगचा प्रभाव असल्याचे म्हटले. तर एकाने ‘बोरिंग’ असे लिहित दीपिकाला ट्रोल केले. हा ड्रेस ट्राय करताना तुझ्या डोक्यात नेमके काय सुरु होते, हे जरा सांगशील? असा प्रश्न एका युजरने तिला केला.

Web Title: deepika padukone black outfit social media users troll actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.