Deepika Padukone arrives at NCB; Sara, Shraddha to appear later today | बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न


सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर येताच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सक्रीय झाले आणि पाठोपाठ बॉलिवूडच्या दिग्गज कलाकाराची नावे समोर आलीत. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, सीमोन खंबाटा अशा अनेकांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणात दीपिका पदुकोणचे नाव समोर आल्यापासून ती चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मा प्रॉडक्शनच्या सिनेमासाठी ती गोव्यात शूटिंग करत होती. आज दीपिकाला चौकशीसाठी बोलवले गेले होते.आता एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.  दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये एका वॉटसअप ग्रुपमधून ड्रग्जची मागणी केली होती. याच चॅट ग्रुपची दीपिका अ‍ॅडमिन असल्याची माहिती समोर आली होती. 

बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी करिश्माकडे याबाबत एनसीबीने चौकशी केली. तिने या ड्रग्ज संवादाबाबत कबुली दिल्याचेही समजते.‘माल है क्या?’, असा सवाल दीपिकाने केला होता. यात माल म्हणजे नेमके काय? अशाच अनेक प्रश्नांबाबत करिश्माकडे चौकशी करण्यात आली.आज या ग्रुपसह या संवादातील ड्रग्जबाबत दीपिकाकडे चौकशी करण्यात येणार आहे.


दीपिकाला प्रश्न विचारण्यासाठी एनसीबीची प्रश्नांची यादी तयार आहे. प्रश्न त्या ड्रग्ज चॅटपासून सुरू होईल, परंतु ही चौकशी कोठे संपेल हे कोणालाही ठाऊक नाही. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिका यांना हे प्रश्न विचारले जाऊ शकतात:-

 नैराश्याला बळी पडल्यानंतरच दीपिकाने ड्रग्ज घेणे सुरू केले का ? दीपिका उदासीनतेच्या वेळी क्वानच्या मॅनेजर करिष्माशी संपर्क साधला होता का? करिष्मासोबत नैराश्याविषयी बोलताना ती ड्रग्जच्या विश्वात गेली का ? दीपिकाला बॉलिवूड पार्ट्यांकडून ड्रगची लत लागली का? दीपिका पादुकोणला ड्रग्स कुठून मिळत ? तिला प्रत्येक वेळी क्वानच्या मॅनेजरकडून ड्रग्ज मिळत का? किंवा दीपिकाच्या संपर्कातड्रॅग पेडलर होता का? बॉलिवूडमध्ये बऱ्याच पार्ट्यांमध्ये ड्रग्ज जास्त घेतली जातात, मग दीपिकाचा दुसरा ड्रग्ज पार्टनर कोण आहे? दीपिकासमवेत या ड्रग्जच्या जाळ्यात इतर कोणते सेलिब्रिटी आहेत?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone arrives at NCB; Sara, Shraddha to appear later today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.