deepika padukone and ranveer singh seek blessings at golden temple on 1st anniversary | दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल

दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल

ठळक मुद्दे लग्नाच्या  6 वर्षे आधीपासून दीपिका व रणवीर रिलेशनशिपमध्ये होते.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांनी काल 14 नोव्हेंबरला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिरूमला येथील तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. यानंतर  दीपवीरने अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. यावेळी रणवीर आणि दीपिका दोघांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. सुवर्णमंदिरात दर्शनासाठी पोहोचलेली दीपिका पुन्हा एका पारंपरिक वेषात दिसली. पर्पल कलरच्या सूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.  रणवीर कुर्ता व नेहरू जॅकेटमध्ये दिसला.
सुवर्णमंदिराबाहेर दीपवीरने अनेक पोझ दिल्यात. यावेळी त्यांच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सध्या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नाच्या वाढदिवसाला बॉलिवूडमध्ये जंगी पार्ट्यांचे आयोजन करतात. पण दीपवीरने मात्र पार्टी टाळत तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचे नियोजन केले.
काल दीपवीरने तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले होते. यावेळी तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. गोल्ड ज्वेलरी, भांगातील कुंकू तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत होते. तर रणवीरने शेरवानी घातली होती.  
 लग्नाच्या  6 वर्षे आधीपासून दीपिका व रणवीर रिलेशनशिपमध्ये होते. गलियों की रासलीला: रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी  या चित्रपटांमध्ये या जोडप्याने एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, ही जोडी पुन्हा एकदा ‘83’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा आगामी सिनेमा सन 1983 साली भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या विजयी गाथेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: deepika padukone and ranveer singh seek blessings at golden temple on 1st anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.