ठळक मुद्दे दीपिका लवकरच माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित ‘83’  या सिनेमात झळकणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अपेक्षेनुसार कमाई केली नाही. पण चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले.  लवकरच दीपिका पती रणवीर सिंगसोबत ‘83’ या चित्रपटात झळकणार आहे. तूर्तास दीपिका तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. होय, दीपिकाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सध्या तिचे हे फोटो वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहेत.

  व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

फोटोंकडे पाहून कुणी दीपिकाला रिअल-लाइफ मर्मेड म्हणत आहे, तर कोणी तिला खूपच हॉट असल्याची प्रतिक्रिया देत आहे.   लग्नानंतर दीपिकाचे हे सर्वात हॉट फोटोशूट आहे.  दीपिकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे.

नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात तिने अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. दीपिकाला या चित्रपटाकडून मोठ्या आशा होत्या. पण याचदरम्यान दीपिकाने जेएनयू आंदोलकांची भेट घेतली आणि वाद निर्माण झाला.

या वादामुळे तिचा हा सिनेमाही वादाच्या भोव-यात अडकला.   दीपिका लवकरच माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित ‘83’  या सिनेमात झळकणार आहे. यात ती पती रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.  

भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची कथा ‘83’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: deepika padukon hot photoshoot on beach-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.