Deepika padukon in classic black top and denims combo with rs 2 lakh bag pictures viral | अबब! इतक्या लाखांची बॅग वापरते दीपिका पादुकोण, किंमत ऐकून व्हाल थक्क..

अबब! इतक्या लाखांची बॅग वापरते दीपिका पादुकोण, किंमत ऐकून व्हाल थक्क..

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण अभिनयाव्यतिरिक्त तिच्या लूक आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत ती नेहमीच जास्त सजग असते. नुकतीच दीपिका सिद्धांत चर्तुर्वेदीसोत तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करुन अलिबागवरुन परतली आहे. शूटिंगसाठी मुंबईवरुन रवाना होताना दीपिका स्टायलिश लूकमध्ये गेट वे ऑफ इंंडियाजवळ दिसली होती. 

शकुन बत्राच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी अलिबागला जाताना दीपिकाने ब्लॅक टॉप आणि डेनिम जीन्समध्ये होती.यासोबत तिने एक सुंदर काळा रंगाची बॅग खाद्यांला लावली होती जिने सगळ्यांचं लक्ष वेधलं. दिपिकाच्या गेटअपसोबत ही बॅग कूल दिसत होती. दीपिकाच्या या बॅगची किंमत ऐकून तुम्ही अवाक् व्हाल.  

आजतकच्या रिपोर्टनुसार दीपिकाने  Louis Vuitton OnTheGo GMची बॅग घेतली होती. जिची मार्केटमध्ये किंमत जवळपास २ लाख ४७ हजार ५४३ रुपये  इतकी आहे. 

आज दीपिका गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत मुंबईला परतली आहे. दीपिका आणि सिद्धांतच्या या सिनेमाचे नाव अजून ठरलेलं नाही. मात्र याआधी या सिनेमाचे शूटिंग गोव्यात झाले आहे. दीपिका आणि सिद्धांतशिवाय यात अनन्या पांडेही दिसणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika padukon in classic black top and denims combo with rs 2 lakh bag pictures viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.