ठळक मुद्देवरीना हुसैन हिने याचवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटातून ग्रॅण्ड डेब्यू केला.

बॉलिवूडचा मसाला चित्रपट असेल आणि त्यात आयटम सॉन्ग नसेल, हे शक्यच नाही. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी उडत्या चालीचे अनेक आयटम सॉन्ग चित्रपटात दिसू लागले.  आयटम नंबर करणा-या अभिनेत्रींना ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या आयटम नंबर्सनी बॉलिवूडला अनेक आयटम गर्ल दिल्यात. अशात येत्या 20 डिसेंबरला रिलीज होऊ घातलेल्या ‘दबंग 3’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडला आणखी एक आयटम गर्ल मिळणार आहे. होय, ‘दबंग 3’च्या ‘मुन्ना बदनाम ’ या आयटम सॉन्गमध्ये अभिनेत्री वरीना हुसैन सलमानसोबत ठुमके लावताना दिसणार आहे.

‘दबंग 3’ सुपरडुपर व्हावा यासाठी सलमान, अरबाज यांनी कुठलीही कसर सोडलेली नाही.   ग्लॅमरचा तडका देण्यासाठी सोनाक्षी सिन्हा व सई मांजरेकर या चित्रपटात आहे. पण याऊपरही वरिना हुसैन  हॉट अवतारात‘दबंग 3’मध्ये दिसणार आहे. ‘मुन्ना बदनाम’ या गाण्यात वरिना बोल्ड रूपातील ‘लटके झटके’ पाहायला मिळत आहेत. अर्थात इतके असूनही आधीच्या दोन ‘मुन्नी’समोर ती फिकी दिसतेय.
होय, ‘दबंग 2’मधली करिना कपूर आणि ‘दबंग’मधील मलायका अरोरापुढे वरिना ही नवी मुन्नी कुठेही नाही.

‘दबंग 2’मध्ये ‘फेविकोल से’ या आयटम सॉन्गमधील करिनाच्या डान्सने चाहत्यांना बेधुंद केले होते.  2010 मध्ये ‘दबंग’मध्ये ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यावर मलायका अरोरा थिरकताना दिसली होती. मलायकाच्या या आयटम सॉन्गमध्ये अशी काही आग लावली होती की, चाहते बेभान झाले होते. नवी मुन्नी अर्थात वरिना हुसैन करिना आणि मलायकाच्या तुलनेत जरा फिकी वाटते.  ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्याची झलक पाहिली तरी तुम्हालाही ते जाणवेल.

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, किच्चा सुदीप मुख्य भूमिकेत आहेत. ‘दबंग’  या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात सलमानने साकारलेली चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. या चित्रपटाची सगळीच गाणी चांगलीच गाजली होती. 

Web Title: dabangg 3 warina hussain not impress in munna badnaam hua as malika arora and kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.