This cute photo is going viral 15 years ago by Sara Ali Khan, TJL | 15 वर्षांपूर्वी अशी दिसायची सारा अली खान, हा क्यूट फोटो होतोय व्हायरल

15 वर्षांपूर्वी अशी दिसायची सारा अली खान, हा क्यूट फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच अभिनेत्री सारा अली खान हिने आपले स्थान निर्माण केलं. कधी भूमिकेमुळे तर कधी अफेयरमुळे चर्चेत येणारी सारा आता जुन्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिचा 15 वर्षांपूर्वीचा जुना फोटो आहे आणि यात ती खूप क्युट दिसते आहे. तिच्या या फोटोवर खूप कमेंट्स येत आहेत. हा फोटो साराने शेअर केलेला नाही. मात्र हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.हा फोटो 2005 साली काढलेला असून त्यावेळी कुणाला वाटलं पण नसेल की ही गोंडस मुलगी मोठी होऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.

सारा अली खानचा बालपणीचा फोटो विरल भयानीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो 2005 साली काढलेला असून सारा कोणत्यातरी इव्हेंटमध्ये गेली असल्याचं दिसते आहे. तिने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. मोठ्या हिलच्या सँडल हातात पकडलेल्या दिसत आहे. तिच्या आजूबाजूला खूप लोकही पहायला मिळत आहेत. या फोटोतील साराची क्युटनेस लोकांना खूप भावते आहे.

साराच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. साराला नटण्याची व एक्टिंगची आवड लहानपणापासूनच होती आणि ही गोष्ट तिने बऱ्याच मुलाखतीत कबूल केली आहे.

काही दिवसांपूर्वी साराचा डान्स व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. यात ती क्लासिकल डान्स करताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओदेखील चर्चेत आला होता.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This cute photo is going viral 15 years ago by Sara Ali Khan, TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.