कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले आहेत. या प्रकोपा ला घाबरून लोक परदेशातून आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत.परदेशातून आलेल्या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक घराकडे परतत आहेत. या यादीत बॉलिवूड च्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे जे परदेशात होते आणि आता परत भारतात परतत आहेत.

सोनम कपूर

या यादीत सर्वात आधी नाव येतं सोनम कपूरचे. सोनम नुकतीच तिचा नवरा आनंद आहुजासोबत लंडनमधून भारतात परतली आहे. तिथून आल्यानंतर तिने स्वतःला 14 दिवस आइसोलेशनमध्ये ठेवले होते. लंडनवरून परतल्यानंतर एअरपोर्टवर सोनमची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. तरीदेखील तिने स्वतःला आइसोलेशनमध्ये ठेवले होते.

अनुपम खेर

अनुपम खेर देखील शुक्रवारी युएसमधून भारतात परतले आहेत. अनुपम खेर त्यांचे न्यूयॉर्कमध्ये आगामी शोच्या शूटिंगसाठी गेले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे शूटिंगमध्येच थांबवावे लागले आणि ते भारतात परतले. एअरपोर्टवर त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. ते स्वतः सेल्फ आइसोलेशनमध्ये आहेत.

शबाना आझमी

अनुपम खेर यांच्याशिवाय शबाना आझमीदेखील बुडापेस्ट येथून परतल्या आहेत. त्यांनी ट्विट करत सेल्फ आइसोलेशनची माहिती दिली होती.

कनिका कपूर

या सेलिब्रेटींशिवाय बॉलिवूड सिंगर कनिका कपूरदेखील काही दिवसांपूर्वी लंडनवरून परतली आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये कनिका पहिली केस आहे जिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कनिका कोरोना व्हायरसची झालेल्या लागणमुळे खूप चर्चेत येत आहे. 

खरेतर लंडनवरून परतल्यानंतर तिने लखनऊ व काही दुसऱ्या ठिकाणी पार्टी अटेंड केली. या पार्टीत वसुंधरा राजे, दुष्यंत सिंग यांच्यासोबत काही दिग्गज नेते उपस्थित होते. कनिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या सर्व लोकांमध्ये भीतीचं सावट आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Bollywood celebrity who returned to India from abroad, got a Corona positive case so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.