Corona Virus: Tusi Great Ho, Akshay Kumar donates 25 crores to PM-CARES Fund-SRJ | Corona Virus: तुस्सी ग्रेट हो, खिलाडी अक्षय कुमारने करोना विषाणूशी लढण्यासाठी केली कोट्यवधींची मदत, सर्वाधिक रक्कम देणारा तो पहिला अभिनेता

Corona Virus: तुस्सी ग्रेट हो, खिलाडी अक्षय कुमारने करोना विषाणूशी लढण्यासाठी केली कोट्यवधींची मदत, सर्वाधिक रक्कम देणारा तो पहिला अभिनेता

'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.  मात्र जेव्हा संकट येते तेव्हा मात्र अक्षय प्रत्येकाला मदतीचा हात देत असतो हे ही तितकेच खरे आहे. अक्षय हा फक्त रिल नाही तर रिअल लाइफमध्येही हीरो आहे हेच पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. 

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना नावाच्या संकटाशी लढा देणा-या देशातील लोकांसाठी अभिनेता अक्षय कुमारदेखील दानवीर म्हणून पुढे आला आहे. अक्षयने कोरोनोव्हायरसशी लढण्यासाठी एक नाही दोन नाही तर चक्क २५ कोटी रुपये दान केले आहेत. फक्त रील लाइफच नव्हे तर ख-या आयुष्यातही  खिलाडींयों का खिलाडी आहे अक्षय कुमार हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी आपपल्या परिने कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहेत. यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हळुहळु बॉलिवूडमधील अनेक कलाकाराही मदतीतसाठी सरसावत आहेत. मात्र आर्थिक मदत करण्यात अक्की अक्षय कुमारने सा-यांनाच मागे टाकले आहे. सर्वाधिक रक्कम निधीत देणारा अक्की हा पहिला अभिनेता ठरला आहे.

Web Title: Corona Virus: Tusi Great Ho, Akshay Kumar donates 25 crores to PM-CARES Fund-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.