Corona : If you are tired of sitting at home during lockdown, just do subscribe Bharatiya Digital Party BhaDiPa-ram | Corona : लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कंटाळलात, तर हा आहे मनोरंजनाचा एक पर्याय

Corona : लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कंटाळलात, तर हा आहे मनोरंजनाचा एक पर्याय

 जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसची दहशत इतकी की,लोकांवर आपआपल्या घरात कोंडून घेण्याची वेळ आलीय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी, त्याची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. पण या लॉकडाऊनमुळे 21 दिवस घरात बसून काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडलाय. अशात टीव्ही, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शो सगळ्यांचेच शूटींग रद्द घझाल्याने करमणुकीची चिंता वाढलीय. पण आता चिंता नसावी. कारण आता भारतीय डिजिटल पार्टीने अर्थात भाडिपाने लॉकडाऊनच्या काळात जनतेची करमणूक करण्याचा प्रण केला आहे. होय, कुठल्याही स्थितीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे थांबवणार नाही, असा निर्धार भाडिपाने व्यक्त केला आहे.

तर आता एकच करा, सरकारच्या लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून घरीच बसून फक्त भाडिपाचे युट्यूब, फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमांना फॉलो करा.
या लॉकडाऊनच्या काळात भाडिपाने आणखी दोन नवे चॅनल्स सुरु केले आहेत. होय, भारतीय टुरिंग पार्टी आणि विषय खोल म्हणजेच तिन्ही चॅनल्सद्वारे 21 दिवस 21 व्हिडीओ आव्हान स्वीकारले आहे. याअंतर्गत भाडिपा रोज प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी दर दिवशी एक तरी व्हिडीओ रिलीज करेल.

अलीकडे भाडिपाने फ्रेंड्स या जगप्रसिद्ध इंग्लिश सीरिजचे टायटल सॉन्ग मराठी कव्हरमध्ये सादर केले. यात भाडिपाची सहसंस्थापक पॉला मॅकग्लिन ही गिटार वाजवत हे भन्नाट मराठी गाणं गाताना दिसली. हा आगळावेगळा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. यानंतर जेव्हा बहिणीची फ्रेंड तुमची क्रश असते हे कॉमेडी स्केच भाडिपाने रिलीज केले.
येत्या दिवसांत भाडिपा नवनवीन कलाकृती घेऊन आपल्या मनोरंजनासाठी येत आहे. तेव्हा घरी बसून कंटाळा आला असेल तर भाडिपा, bha2pa आणि विषय खोल या चॅनेल्सना सबस्क्राइब करा आणि लॉकडाऊन्च्या काळात सुरक्षित राहा.

Web Title: Corona : If you are tired of sitting at home during lockdown, just do subscribe Bharatiya Digital Party BhaDiPa-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.