बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट कुली नं १चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोघांची खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते आहे. चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसने परिपूर्ण असा आहे. यात वरूण धवनचा कॉमिक टाइमिंग कमालचा दिसतो आहे. तर सारा अली खानदेखील कॉमेडी करताना क्यूट दिसते आहे. ट्रेलरमध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळते आहे. हा डेविड धवन यांचा ४५वा चित्रपट आहे.


कुली नं १ चित्रपटात परेश रावल सारा अली खानच्या वडीलांच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. यात वरूण धवन वेगवेगळ्या भूमिकेत दिसतो आहे. तर पोलिसाच्या भूमिकेत जॉनी लिव्हर कॉमेडी करताना दिसतो आहे. तो राजू कुलीचा पर्दाफाश करताना दिसतो आहे. चित्रपटातील गाणी देखील दमदार झाली आहे. चित्रपटाची कथा गोविंदा आणि करीश्मा कपूर अभिनीत कुली नं १ पेक्षा थोडी वेगळी आहे. जिथे गोविंदा बस डेपोमधील कुली असतो तर इथे वरूण धवन रेल्वे स्टेशनचा कुली दाखवला आहे.


ट्रेलर लाँचवेळी अभिनेता वरुण धवन म्हणाला की “मला मूळ कुली नं १ ची पटकथा आणि त्यातील अभिनय खूप आवडतो . ह्या क्लासिकचे हे रूपांतर माझ्यासाठी खूपच खास होण्याचे हे ही एक कारण आहे . “या भूमिकेसाठीची तयारी करणे, हे माझ्यासाठी एक आव्हानच होते . एक अभिनेता म्हणून विनोदी चित्रपट करतांना खूपच मजा आली. अत्यंत प्रतिभावंत असलेल्या साराबरोबर काम करण्याचा मला एक अद्भुत अनुभव आला. 


सारा म्हणाली की, कुली नं 1 मध्ये काम केल्याने खरोखरच माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. ‘हुस्न है सुहाना’ आणि ‘मिर्ची लगी’ अशी गाणी ऐकून आपण मोठे झाले आहोत आणि आता या गाण्यांच्या नवीन आवृत्त्या मध्ये मी आहे हे किती सुखद आहे! वरुणसोबत काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता कारण तो केवळ एक अभिनेताच नाही तर तो एक अत्यंत विचारशील, मदत करण्यास सदा तत्पर आणि प्रेरणादायी मित्र देखील आहे जो नेहमीच सेटवर आपल्या पाठीमागे उभा असतो. डेव्हिड सरांसोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अत्यंत मोठा सन्मान होता कारण माझा असा विश्वास आहे की ते अशा  व्यावसायिक, मसाला, कौटुंबिक कॉमेडी चित्रपट शैलीचे सम्राट आहेत .दररोज सेटवर मस्तीची दंगल होत असे पण त्याच वेळी परेश सर, राजपाल सर, जॉनी सर, भारती मैम, जावेद सर आणि अगदी साहिल आणि शिखा यासारख्या दिग्गज कलाकारांना पाहून बरेच काही शिकायला मिळाले. मला ही संधी दिल्याबद्दल आणि या चित्रपटाद्वारे आम्हाला खूप सहकार्य केल्याबद्दल मी जॅकी आणि वासू सरांची खूप आभारी आहे! या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खरोखरच उत्सुक आहे.


१९९५ साली रिलीज झालेल्या कुली नंबर १चा हा रिमेक असून यात वरूण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबरला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coolie No. 1 Trailer: Coolie no. Trailer of 1 has been released, Varun and Sara's romantic chemistry with comedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.