2003 साली रिलीज झालेला चित्रपट बूममध्ये अमिताभ बच्चनकतरिना कैफने एकत्र काम केले होते आणि आता इंडस्ट्रीत चर्चा आहे की 17 वर्षांनंतर आता दोघे पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. असे वृत्त आहे की कतरिनाने नुकताच दिग्दर्शक विकास बहलचा एक चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाचं नाव आहे डेडली. या सिनेमात अमिताभ बच्चनकतरिना कैफच्या वडीलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वृत्तासोबत अमिताभ बच्चन व कतरिना कैफ यांचा चित्रपट बूमचा किस्सा चर्चेत आला आहे. 

कतरिना कैफने 2003 साली प्रदर्शित झालेल्या बूम चित्रपटातून पदार्पण केले होते. दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांचा हा चित्रपट बोल्ड कंटेटमुळे खूप चर्चेत आला होता. यात कतरिना व गुलशन ग्रोवर यांच्यात लीपलॉक सीन होता. ज्यासाठी त्यांनी प्रॅक्टिसदेखील केली होती.


गुलशन ग्रोवर यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, बूम चित्रपटातील किसिंग सीनवेळी ते खूप नर्व्हस होते. त्यासाठी मी बंद खोलीत कतरिनासोबक कित्येक वेळा स्मूच करण्याचा सराव केला होता.


गुलशन यांनी पुढे सांगितले की, जेव्हा ते एका खोलीत स्मूच सीनची प्रॅक्टिस करत होते. तेव्हा अचानक तिथे अमिताभ बच्चन आले आणि त्यांनी सर्वकाही पाहिले होते. त्यांनी आम्हाला चीअर केले होते. मात्र त्यानंतर माझी हालत आणखीन वाईट झाली होती.
हा सीन माझ्या करियरमधील सर्वात कठीण सीन होता. हा सीन शूट करण्यासाठी दोन तास लागले होते. याचे शूटिंग दुबईतील हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये झाले होते.


किस सीनच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी कतरिनाला सांगितले की, तिला टेबलवर बसून गुलशनची कॉलर पकडून गुलशन यांनी किस करायचे आहे. असेही सांगितले जाते की हे ऐकल्यानंतर गुलशन ग्रोव्हर शॉक्ड झाले होते. मात्र कतरिना कैफने कॉन्फिडंसने हा सीन पूर्ण केला होता.


जेव्हा कतरिना इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली. त्यावेळी ती किसिंग सीनमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी कतरिनाशी उत्तर मागितले तेव्हा तिने सांगितले होते की, यावर कसे रिएक्ट करू? आणि या सीनमध्ये काय नवीन होते? बूम नेहमीच इंटरनेटवर चर्चेचा विषय बनून राहिला आहे, मी नकार देणार नाही की मी असा काही सीन केला आहे. मात्र त्यावेळी मी कम्फर्टेबल नव्हते.

Web Title: In the closed room Katrina Kaif was working with the actor Kiss, Big B was caught TJl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.