चित्रांगदा सिंगने केला कास्टिंग काऊचबाबत खुलासा, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 08:00 AM2020-05-08T08:00:00+5:302020-05-08T08:00:00+5:30

चित्रांगदा सिंगलाही कास्टिंग काऊचला जावे लागले होते सामोरे

Chitrangada Singh reveals about casting couch, find out TJL | चित्रांगदा सिंगने केला कास्टिंग काऊचबाबत खुलासा, जाणून घ्या याबद्दल

चित्रांगदा सिंगने केला कास्टिंग काऊचबाबत खुलासा, जाणून घ्या याबद्दल

Next

बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटी कास्टिंग काउचबाबतचा अनुभव शेअर करताना दिसतात. आता बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिलाही कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. याबाबतचा खुलासा तिने केला आहे.

चित्रांगदा सिंगने सांगितले की, अशाप्रकारचे लोक सगळीकडे आहेत. माझ्या मॉडेलिंगच्या काळापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या प्रवासात मी कित्येक वेळा कास्टिंग काउचला सामोरी गेली आहे. कॉर्पोरेट इंडस्ट्रीतही हीच परिस्थिती आहे. माझ्यासोबत हे झाले आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीत अशी एक जागा आहे जिथे कुणी कोणाला जबरदस्ती करत नाही. इथे प्रत्येक स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. तुम्हाला वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुमच्याकडील संधी फक्त या कारणामुळे निघून जाते.

ती पुढे म्हणाली की, जर कोणी कॉम्प्रमाइज करायला तयार आहे आणि त्यांना त्यांच्याकडील संधी गमवायची नाही तर ती त्यांची मर्जी असते.

लॉकडाउनबद्दल सांगायचं तर चित्रांगदाने सांगितले की ती कशी वेळ व्यतित करत आहे. तिने सांगितले की, ती रोज वर्कआऊट करते. आधी मी दररोज वर्कआऊट करत नव्हते पण आता मी दररोज एक्सरसाइज करते आहे. हल्ली मी योगा करते आहे आणि माझ्या फिटनेसकडे लक्ष देते आहे.

Web Title: Chitrangada Singh reveals about casting couch, find out TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app