Since childhood deepika had mourned acting at the age of only eight years the first advertisement | 8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी

8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव आल्यानंतर सगळचे हैराण झाले होते. दीपिकाचे तीन वर्ष जुने व्हायरल झाले आहेत. ज्यात दीपिका तिची मॅनेजर करिश्माशी बोलते आहे.  28 ऑक्टोबर 2017 मध्ये एका पार्टीमध्ये तिने 'माल'ची विचारणा केली आणि तिला गांजाची पूर्तता केली जाईल, सांगण्यात आले आहे. त्याबाबत एनसीबीचे अधिकारी तिची चौकशी करणार आहेत. दीपिका पादुकोणने तिचे ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर करिश्मा प्रकाश आणि टॅलेंट मॅनेजर जया साहाला यासाठी जबाबदार ठरवले आहे.

दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 साली डेनमार्क मध्ये झाला होता. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकाची आई  उज्ज्वला पादुकोण ट्रॅव्हल एजंट होती. दीपिकाला अनीषा पादुकोण नावाची एक छोटी बहीण आहे जी गोल्फर आहे.दीपिका जेव्हा 11 महिन्यांची होती तेव्हा तिचे कुटुंब बंगळुरूमध्ये आले. दीपिका बऱ्याचदा तिच्या बंगळुरुमधील घरी जात असते. 


एका सिनेमासाठी घेते 15 कोटींचे मानधन
दीपिकाचा कल बॅडमिंटनकडे होता आणि ती राष्ट्रीय स्तराची बॅडमिंटनपटू आहे. दीपिकाने वयाच्या केवळ आठव्या वर्षी पहिल्यांदा जाहिरातीसाठी काम केले. त्यानंतर ती जाहिरातीनंतर तिला कळले की तिला बॅडमिंटन नाही तर अभिनयात जास्त रस आहे. एबीपीन्यूजच्या रिपोर्टनुसार, दीपिका एका सिनेमासाठी 15 कोटी रुपयांचे मानधन घेते.  

दीपिका गोव्याहून मुंबईला रवाना 
दीपिका पादुकोणने गोवा सोडलं असून दीपिका गोव्याहून व्हाया रोड मुंबईला पोहोचू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने एनसीबीच्या नोटीसला उत्तर देताना सांगितले की, ती उद्या चौकशीसाठी हजर राहील. तिच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.दीपिका मुंबईत 12 लोकांच्या लीगल टीमशी व्हिडीओ कॉलने संपर्कात आहेत. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग या टीमचा भाग आहे. एनसीबीने दीपिकाला 25 सप्टेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात दीपिका सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्यात गेली होती. 
 

पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास

दीपिका पादुकोण तुरूंगात जाणार! ड्रग्स प्रकरणी चौकशीआधीच केआरकेने केली भविष्यवाणी!

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Since childhood deepika had mourned acting at the age of only eight years the first advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.