छपाक या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला इतका तास करावा लागतो मेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:00 AM2019-04-14T06:00:00+5:302019-04-14T12:33:59+5:30

छपाक या चित्रपटातील दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिकाला रोज या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसावे लागते.

'Chhapaak' is consuming a lot of time of Deepika Padukone | छपाक या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला इतका तास करावा लागतो मेकअप

छपाक या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला इतका तास करावा लागतो मेकअप

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाने छपाक चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यातील दीपिकाचा लूक पाहून सगळेच जण हैराण झाले होते. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. या पोस्टरमध्ये दीपिका लक्ष्मी सारखीच हुबेहुब दिसत असून हा चित्रपट खूपच चांगला असणार असल्याची तिच्या चाहत्यांना खात्री आहे. 'छपाक'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती आहे.

छपाक या चित्रपटातील दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिकाला रोज या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसावे लागते. दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. 

नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात ती पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून भररस्त्यात एकटी उभी होती. मात्र तिला कुणीच ओळखू शकले नाही. या व्हिडिओत अभिनेता विक्रांत मेसीसोबत बाइकवरून उतरताना दीपिका दिसली. विक्रांत हेल्मेट काढून तिथून निघून गेला आणि दीपिका त्याच ठिकाणी उभी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दीपिका 'छपाक'मधील मालतीच्या लूकमध्ये दिसली. त्यावेळी तिला कुणीच ओळखले नाही. 

'छपाक' चित्रपटात दीपिकाची भूमिका प्रचंड आव्हानात्मक असून सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच विक्रांत मेसी दीपिकासोबत काम करत आहे. विक्रांतने दीपिकासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले की, 'दीपिकासारख्या अभिनेत्रीसोबत काम करणे फक्त संधी नसून जबाबदारी देखील आहे. मी खूप नर्व्हस आणि उत्सुक आहे.' छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'Chhapaak' is consuming a lot of time of Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.