ठळक मुद्देसोनमच्या कान्स लूकने अनेकांची मने जिंकलीत.

बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर हिचा कान्स लूक पाहण्यास सगळेच उत्सुक होते. त्यानुसार, सोनम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरली आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ केले. सोनमने रेड कार्पेटवर अगदी जबरदस्त एन्ट्री घेतली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.


कान्सच्या Chopard पार्टीत सोनम वन आॅफ शोल्डर सील्वर गाऊनमध्ये दिसली. पफ स्लीवसोबत अटॅच केलेला एक लांब स्क्रॉफ आणि गळ्यांत मॅचिंग डायमंड चोकर असा तिचा क्लासी लूक होता. स्मोकी आयमेकअप आणि न्यूड लिपस्टिकसोबत सोनम कमालीची बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती.


कान्समधील तिचा सेकंड लूक पाहूनही लोक घायाळ झालेत. यादरम्यान सोनम Maison Valentinoच्या रेड शीर गाऊनमध्ये दिसली. या गाऊनवर फ्रिल्सच्या अनेक लेअर होत्या. स्लीववरही फ्रिल्सच्या अनेक लेअर होत्या. या लूकमधील सगळ्यात हायलाईटिंग फिचर म्हणजे, तिची हेअरस्टाईल. केसांना सैल बांधत त्यावर ताजी फुले माळण्यात आली होती. सुप्रसिद्ध हेअरस्टाईलिस्ट हिराल भाटियाने तिची ही हेअरस्टाईल डिझाईन केली होती. शिमरी आय मेकअप आणि ब्लश पिंक लिपस्टिकने तिचा हा लूक आणखीच खुलून आला होता.


कान्समधील तिचा तिसरा लूकही खास होता. Elie Saabच्या पर्पल गाऊनमध्ये ती दिसली. या गाऊनच्या नेकलाईनवर एक मोठा बो होता, जो सोनमला इतरांपेक्षा खास बनवत होता. यासोबत हातात ग्लव्जही होते. स्लीक पोनीटेल आणि सॉफ्ट मेकअपसह सोनमने हा लूक पूर्ण केला होता.
एकंदर काय तर सोनमच्या कान्स लूकने अनेकांची मने जिंकलीत. पाहुया तिच्या कान्स लूकचे काही खास फोटो....

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cannes 2019: cannes film festival beautiful outfits of sonam kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.