ठळक मुद्देकरिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्याने ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती.

बॉर्डर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला अक्षय खन्नाला पाहायला मिळाले होते. अक्षयचा हा दुसराच चित्रपट असला तरी त्याने अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. त्याने या चित्रपटाप्रमाणेच ‘दिल चाहता है’, ‘डोली सजा के रखना’, ‘ताल’, ‘गांधी माय फादर’, ‘हमराज़’, ‘दिवानगी’, ‘गली-गली चोर है’, ‘आ अब लौट चलें’ आणि ‘हलचल यांसारख्या चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.अक्षय खन्नाच्या खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. 'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं. ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्याने ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती. ते करिश्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिश्माच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. करिश्माचे वडील रणधीर यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांची पत्नी बबिता यांना हे मान्य नव्हतं.करिश्मा त्याकाळात एकाहून एक हिट चित्रपट देत होती. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जात असे. यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करू नये अशी तिची आई बबिता यांची इच्छा होती आणि त्याचमुळे हे लग्न होऊ शकले नाही असे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते अक्षय ऐवजी करिश्माचे अभिषेक बच्चनसोबत लग्न व्हावे असे बबिता यांना वाटत असल्याने त्यांनी या नात्यासाठी नकार दिला होता. 

 

Web Title: border fame akshay khanna wanted to marry with Karisma kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.