Boney Kapoor Is A Gentleman: Urvashi Rautela Defends Him After Viral Video Of Alleged Misconduct | बोनी कपूर यांच्या त्या कारनाम्यावर आता उर्वशी रौतेलाने दिली ही प्रतिक्रिया
बोनी कपूर यांच्या त्या कारनाम्यावर आता उर्वशी रौतेलाने दिली ही प्रतिक्रिया

ठळक मुद्देकोणत्याही व्यक्तीविषयी चुकीचे बोलताना अथवा लिहिताना सोशल मीडियावर तसेच वेबसाईटवर कोणताच विचार केला जात नाही. ते सद्गृहस्थ असून त्यांना ट्रोल करणे बंद करा. या सगळ्या गोष्टीचे मला प्रचंड वाईट वाटले आहे.

बॉलिवूड निर्माते जयंतीलाल गडा यांच्या मुलाचे नुकतेच ग्रँड रिसेप्शन मुंबईत पार पडले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेंटीनी या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. या रिसेप्शनची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या रिसेप्शनमधील सेलिब्रेटींचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ आहे अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि बोनी कपूर यांचा. व्हिडीओत दोघेही मीडियाच्या कॅमेऱ्यांना पोज देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आणखीन थोडा बारकाईने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, बोनी कपूर उर्वशीच्या बंपवर हात मारताना दिसतायेत.

यावेळी उर्वशी रौतेलालाही थोडी ऑक्वर्ड झाल्याचे तिच्या चेहऱ्याच्या हावभावावरून दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून बऱ्याच जणांनी बोनी कपूर यांना टार्गेट केले आहे. युजर्सने कमेंट करत बोनी कपूर यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. बोनी कपूर यांचे असे वागणे हे नक्कीच शोभनीय नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यांच्या विरोधात नेटिझन्स कमेंट करत आपला राग व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  

बोनी कपूर आणि उर्वशी रौतेलाच्या या व्हिडिओवर आता उर्वशी रौतेलाने प्रतिक्रिया दिली आहे. तिने या बातमीचा स्नॅपशॉट सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, महिलांना कशाप्रकारे सन्मान द्यायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर महिला शक्ती या विषयावर तुम्ही बोलणे सोडून द्या. एका प्रसिद्ध वर्तमानपत्राची ही बातमी सकाळी वाचल्यानंतर मला धक्काच बसला. रिसेप्शन मधील या व्हिडिओसाठी बोनी कपूर यांना ट्रोल केले जात आहे हे पाहून तर मला काय बोलायचे हेच सूचत नाहीये. कोणत्याही व्यक्तीविषयी चुकीचे बोलताना अथवा लिहिताना सोशल मीडियावर तसेच वेबसाईटवर कोणताच विचार केला जात नाही. ते सद्गृहस्थ असून त्यांना ट्रोल करणे बंद करा. या सगळ्या गोष्टीचे मला प्रचंड वाईट वाटले आहे. मला बोनी सरांविषयी प्रचंड आदर असून मी त्यांच्या पाठिशी आहे.  

Web Title: Boney Kapoor Is A Gentleman: Urvashi Rautela Defends Him After Viral Video Of Alleged Misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.