-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये आपण प्रेम, अफेअर, लग्न, घटस्पोट, मैत्री आदी विषयांच्या चर्चा नेहमीच ऐकतो. याठिकाणी जेवढ्या प्रभावीपणे या गोष्टी घडतात, तेवढ्याच प्रमाणात स्टार्सचे एकमेकांबद्दलचे शत्रुत्वदेखील देखील दिसून येते. विशेष म्हणजे दीर्घकाळापासूनचे स्टार वॉर आजपर्यंत संपलेले नाही. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल...

* सलमान खान आणि अरिजित सिंग


सलमान खानचा जेव्हा ‘वीर’ हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा अरिजित सिंगने ‘क्या सर, सुला दिया आपने..’ असे स्टेटमेंट दिले होते. हे ऐकून सलमानला खूपच संतापला होता. शिवाय सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा त्यात ‘जग घुमिया’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. ह्यात अरिजित सिंगने सुद्धा काही भाग गायलं होते. सलमान खान ह्या गाण्याला चित्रपटांत ठेवू इच्छित नव्हता. अरिजित सिंगने सोशल मीडियावर त्याने हे गाणे काढून टाकण्याबद्दल सलमान खानचा विरोध केला होता. असे म्हटले जाते की, आज अरिजितला सलमानमुळे काम मिळत नाहीय.

* बिपाशा बसू आणि करिना कपूर


‘अजनबी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिना कपूर आणि बिपाशा बसू यांच्यात काहीतरी बिनसलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय कुमार आणि बॉबी देओलही होता. या भांडणाचा राग येऊन करिना कपूरने बिपाशा बसूला ‘काळी मांजर’ म्हणत कानशिलात लागवल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमध्ये शत्रुता कायम आहे. आजही ते एकमेकांशी बोलत नाहीत.

* सलमान खान आणि विवेक ओबेरॉय


सलमान आणि विवेकचे शत्रुत्व तर जगजाहिर आहे. या दोघांतील शत्रुत्वाला जवळपास २० वर्ष होत चालले आहेत. ऐश्वर्या राय वरून ह्या दोघांमधील वादाला सुरुवात झाली होती. विवेक ओबेरॉयने एकदा सांगितले होते कि, सलमानने फोन करून त्याला धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर विवेक ओबेरॉयने सलमान खानची मीडियामध्ये माफी सुद्धा मागितली होती, मात्र सलमानने अजूनही त्याला माफ केले नाही. असे म्हटले जाते की, विवेक ओबेरॉयच्या डुबणाऱ्या करिअरसाठी त्याने सलमान खान सोबत घेतलेली शत्रुता जबाबदार आहे.

* करिना कपूर आणि बॉबी देओल


२००७ साली इम्तियाज अली करिना कपूरला मुख्य अभिनेत्री म्हणून घेऊन ‘जब वि मेट’ चित्रपट बनवत होता. या चित्रपटात करिनाच्या अपोजिट बॉबी देओलच्या नावाची चर्चा होती. मात्र करिनाने त्यावेळी इम्तियाज अलीला सांगून बॉयफ्रेंड शाहिद कपूरला घेण्याचा आग्रह केला आणि इम्तियाजनेही शाहिदला चित्रपटात घेतले. बॉबी देओलला ही गोष्ट खूप खटकली. आणि तेव्हा पासून त्याने करिनाचा राग मनात धरला. दोघांमध्ये आजही दुश्मनी आहे.

* आमिर खान आणि सनी देओल


या दोघांचेही शत्रुत्व दोन दशकापासून आहे. या दोघांची दुश्मनी सुरु झाली ती २००१ मध्ये. यावर्षी एकीकडे एकीकडे आमिर खानचा ‘लगान’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर आला होता, तर त्याच दरम्यान सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट रिलीज करण्यात आला होता. दोघांच्या चित्रपटांची जेव्हा बॉक्स आॅफिसवर टक्कर झाली होती, तेव्हा सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटावर भारी पडला होता. तेव्हापासून आमिर खान सनी देओलवर नाराज झाला होता. त्याचा हा राग आजपर्यंत कमी झालेला नाही आहे.

Web Title: Bollywood stars war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.