‘बाला’,‘शुभमंगल ज्यादा सावधान’,‘बेवकुफियाँ’ असे एक से बढकर एक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवल्यानंतर आता आयुष्मान खुराणा वेगवेगळया प्रोजेक्टवर काम करतोय. पण, त्याच्या करिअरसोबतच तो फॅमिलीलाईफबद्दल बराच चर्चेत असतो. त्याची पत्नी ताहिरा कश्यप खुराना हिने कॅन्सरवर मात केली आहे. त्याने नुकतेच एक फोटो कोलाज सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने चाहत्यांसोबत एक क्षण शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या आयुष्यातला ‘तो’ दिवस आठवतोय, ज्या दिवशी त्याने त्याची पत्नी ताहिराला प्रपोज केले होते. 

आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप खुराणा यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजते. एक जुनी आठवण शेअर करत आयुषमान सांगतो,‘१९ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा बोर्डाच्या परीक्षांची तयारी करत होतो. २००१ मध्ये एके  दिवशी रात्री १:४८ वाजता मी ताहिराला माझे तिच्यावर किती प्रेम आहे, हे कबूल केले. मी फोनवर तिला माझे मत व्यक्त केले.’ त्याने एक फोटो कोलाज शेअर केले आहे. ज्यात ताहिराने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून ती वेगवेगळया इमोशन्सनी क्यूट लूक्स देत आहे. 

वक्रफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, आयुष्मान खुराना नुकताच ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि गजराज राव हे दिसले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Bollywood star remembered the 'special' day in his life; Shared memories!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.