बॉलिवूडमधील बरेचसे चेहरे जे बालपणापासून आतापर्यंत त्यांच्यात इतका बदल झालाय की ते ओळखता देखील येत नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच तिचा एक बालपणीचा फोटो शेअर केला. ज्यात ती ओळखता देखील येत नाही. त्यानंतर करीना कपूर व करीश्मा कपूर यांच्या फॅन पेजवर त्या दोघींच्या बालपणीचा फोटो पहायला मिळाला, ज्यात त्या दोघी खूप क्युट दिसत आहेत. अशा या बॉलिवूडमधील टॉप पाच अभिनेत्रींच्या बालपणींचे फोटो पाहून पहा तुम्हाला त्या ओळखता येतात का?


सोनमने नुकताच तिच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यात ती ट्रेनच्या वरच्या बर्थवर पहायला मिळतेय. तिथे ती आरामात झोपलेल्या पोझमध्ये पहायला मिळतेय. हा फोटो शेअर करून तिनं लिहिलं की, ट्रेनमधून प्रवास करणे खूप वेगळे होते. चांगले सीन पाहणे, ट्रेनमध्ये खाणे. कधी कधी मी ट्रेनमधील प्रवास खूप मिस करते.


सोनमनंतर करीना कपूर व करिश्मा कपूर यांच्या बालपणीचा देखील एक फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाला. या फोटोत करीनाने लाल रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. तर करिश्माने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. त्या दोघी या फोटोत खूप क्युट वाटत आहेत.


काही दिवसांपूर्वी आलिया भटनेदेखील बालपणीचा फोटो शेअर केला होता. त्यात ती तिची आई सोनी राजदान यांच्यासोबत पहायला मिळते आहे. या फोटोत तिच्या हातात एक बॉक्स आहे. हा फोटो शेअर करत आलियाने लिहिले की, सर्वात आनंदी असणारी माझी जागा... लव यू मम्मा.


तर अभिनेत्री श्रद्धा कपूरनेदेखील तिची आई शिवांगीसोबत तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करून श्रद्धाने आपल्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिलं की, माझी आई, माझे जीवन, माझे सर्व काही. हॅप्पी मदर्स डे मम्मी.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood sonam kapoor kareena kapoor karishma alia bhatt and shraddha kapoor childhood photos we give you a challenge to recognize them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.