Lok Sabha Election 2019 : ‘या’ स्टार्सना राजकीय पडदा ठरला तारक-मारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 11:18 AM2019-05-24T11:18:52+5:302019-05-24T11:40:14+5:30

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून हे आता स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. या निवडणुकीत बॉलिवूडच्या बऱ्याच स्टार्सने आपले नशिब आजमावले. अशातच काही स्टार्सना अपयशाचा सामना करावा लागला तर काहींनी रेकॉर्डतोड यश मिळविले. चला तर मग जाणून घेऊया कोणासाठी हा राजकीय पडदा तारक ठरला आणि कोणासाठी मारक ठरला.

bollywood-lok-sabha-election-film-stars-seat-result | Lok Sabha Election 2019 : ‘या’ स्टार्सना राजकीय पडदा ठरला तारक-मारक!

Lok Sabha Election 2019 : ‘या’ स्टार्सना राजकीय पडदा ठरला तारक-मारक!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून हे आता स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. या निवडणुकीत बॉलिवूडच्या बऱ्याच स्टार्सने आपले नशिब आजमावले. अशातच काही स्टार्सना अपयशाचा सामना करावा लागला तर काहींनी रेकॉर्डतोड यश मिळविले. चला तर मग जाणून घेऊया कोणासाठी हा राजकीय पडदा तारक ठरला आणि कोणासाठी मारक ठरला.

* उर्मिला मातोंडकर
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने या निवडणुकीत कॉँग्रेससोबत आपले राजकीय करिअर उत्तर मुंबईमधुन सुरु केले. तिचा सामना भाजपाचे गोपाल शेट्टी यांच्याशी होता. मात्र उर्मिलाला या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला.

* सनी देओल
मोठ्या पडद्यावर दीर्घकाळापासून दबदबा असणारा अभिनेता सनी देओल आपले आई वडील धर्मेंद्र आणि हेमा मालिनीनंतर निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आणि गुरदासपुर लोकसभा जागेवर निवडणुक लढविली. लोकांनीही सनीवर विश्वास दाखवत त्याला निवडून दिले.

* हेमा मालिनी


मथुरा लोकसभा जागेसाठी पुन्हा एकदा भाजपाने हेमा मालिनीवर विश्वास ठेवला. त्यांचा सामना कॉंग्रेसचे उमेदवार महेश पाठक आणि महागठबंधनचे उमेदवार नरेंद्र सिंह यांच्याशी होता. मात्र हेमा मालिनी यांनी या दोघांना पराजय करत आपला विजय निश्चित केला.

* शत्रुघ्न सिन्हा
तब्बल तीन दशकापासून भाजपाशी जुडलेला दिग्गज नेता आणि बॉलिवूडचा ‘शॉट गन’ शत्रुघ्न सिन्हाने लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये भाजपा सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटना जागेवर शत्रुघ्न सिन्हा यांचा सामना भाजपाचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्याशी होता, मात्र शत्रुघ्न सिन्हा यांना याठिकाणी अपयशाचा सामना करावा लागला.

* राज बब्बर


उत्तर प्रदेशची फत्तेपूर सिक्री जागेवर कॉँग्रेसने अभिनेता राज बब्बर यांना तिकिट दिले होते. त्यांचा सामना भाजपाचे तेना राजकुमार चाहर यांच्याशी होता. राजकुमार चाहर यांनी मात्र याठिकाणी राज बब्बर यांना मात देत विजय मिळविला.

* जयाप्रदा
उत्तर प्रदेशच्या रामपुर लोकसभा जागेवर भाजपाने अभिनेत्री जयाप्रदाला आखाड्या उतरवले होते. त्यांचा सामना सपा नेता आजम खॉँ यांच्याशी होता. या लढाईत आजम खॉँ यांनी जयाप्रदाला हरवत विजयश्री मिळविला.

* स्मृति ईरानी
लहान पडद्यावरची तुलसी अर्थात केंद्रिय मंत्री स्मृति ईरानीने अमेठी जागेवर पुन्हा एकदा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सामना केला होता. त्या अगोदर राहुल गांधी विरोधात २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक हारल्या होत्या. मात्र यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना हरवत विजयश्री खेचुन आणला.

* किरण खेर


बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांनी चंदिगढ लोकसभा जागेवर भाजपा तिकिटावर लोकसभा निवडणुक जिंकली. गेल्या वेळेस २०१४ मध्येही त्यांनी विजय मिळविला होता.

Web Title: bollywood-lok-sabha-election-film-stars-seat-result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.