बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यात शाहरूख खानचा मुलगा अबराम, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या, माधुरी दीक्षित नेनेची दोन्ही मुले अरिन व रयान, हृतिक रोशनचे दोन्ही मुले व करिश्मा कपूरचे दोन्ही मुलांनी मुंबईतील लोकप्रिय शाळेत शिक्षण घेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानचा मुलगा अबराम धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतो आहे.अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्यादेखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते आहे. २००३ साली नीता अंबानीने ही शाळा सुरू केली होती.अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव जुहूमधील इकॉले मोंडिआले वर्ल्ड स्कूलमध्ये शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयची मुलगी नितारादेखील याच शाळेत शिकत आहे.माधुरी दीक्षित नेनेचे दोन्ही मुले अरिन व रयान मुंबईतील ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळेत शिकत आहेत. ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळा भारतातील टॉप तीन शाळांपैकी एक आहे.हृतिक रोशन व सुजैनचे दोन्ही मुले धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शाळेत बालवाडीपासून सातवी इयत्तेपर्यंतची फी १ लाख ७० हजार इतकी आहे.करिश्मा कपूरची दोन्ही मुलेदेखील याच शाळेत शिकत आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार शाळेची अ‍ॅडमिशन फी जवळपास २४ लाख रुपये इतकी आहे.

Web Title: Bollywood Celebrity Kids Learn In these schools, you will be shocked to hear the amount of fees TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.